उठा उठा निवडणूक आली, पडून जखमी व्हायची वेळ झाली!!

उठा उठा निवडणूक आली, पडून जखमी व्हायची वेळ झाली!!, अशी खिल्ली सध्या सोशल मीडियावर उडवणे सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विषयी वेगवेगळी मीम्स व्हायरल होत आहेत. ममता बॅनर्जी नेमक्या निवडणुकीच्या मोसमातच कशा कुठे पडून जखमी होतात??, याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या. त्याला कारणही तसेच घडले. Mamata banerji’s political habit to get injured during elections

ममता बॅनर्जींना काल त्यांच्या खासगी निवासस्थानात चक्कर आली. त्यामुळे त्या पडल्या आणि त्यांच्या कपाळावर आणि नाकावर जखम झाली. त्यातून रक्त वाहिले. त्यांना ताबडतोब ऍडमिट करावे लागले. ते फोटो सगळीकडे व्हायरल झाले.

आता मुख्यमंत्री स्वतःच पडल्या म्हटल्यावर सगळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी होऊन उठली. मुख्यमंत्र्यांवर उपचार केले. पंतप्रधानांपासून ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी ममता बॅनर्जी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून ट्विट केले. हा सगळा एपिसोड काल रात्रीपासून सोशल मीडियावर रंगत गेला. त्याला एका डॉक्टरच्या ट्विटचा ट्विस्ट देखील मिळाला. ममता बॅनर्जी चक्कर येऊन पडल्या नाहीत, तर त्यांना कोणीतरी मागून ढकलले आणि त्यामुळे त्याखाली पडून जखमी झाल्या, असे त्या डॉक्टरने म्हटले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना नेमके कोणी ढकलले??, का ढकलले?? त्याचा हेतू काय होता??, वगैरे चर्चा सुरू झाल्या. अगदी थेट गृह मंत्रालयाने हस्तक्षेप करून चौकशी करावी प्रसंगी त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानात हलवावे वगैरे सूचना समोर आल्या.

ममता बॅनर्जींच्या जखमी होण्याभोवती पश्चिम बंगाल मधली जाहीर होण्यापूर्वीची लोकसभा निवडणूक काल आणि आज फिरली. त्याबद्दल खुलासे – प्रतिखुलासे झाले. ममता बॅनर्जींना कोणीही ढकलले नाही. त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्या पडल्या, असा खुलासा त्यांच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार शशी पांजा यांनी केला, पण एकूण ममता जखमी होणे हा विषय “राष्ट्रीय” चर्चेचा झाला.

2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील ममता बॅनर्जी अशाच जखमी झाल्या होत्या. त्यांच्या गाडीच्या दरवाजात त्यांचा पाय अचानक अडकला. दरवाजा लागला गेला. त्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्याला प्लास्टर घालावे लागले. त्या घटनेचे देखील फोटो त्यावेळी खूप व्हायरल झाले त्यामुळे अनेकांनी ममतांची खिल्ली उडवली. ममतांचा नेमका कुठला पाय फ्रॅक्चर झाला आणि कुठल्या पायाला प्लास्टर केले??, याविषयी शंका उपस्थित केल्या.

ममता बॅनर्जींना त्यावेळी अनेकांनी ट्रोल केले. नेमका निवडणुकीच्याच काळात ममता बॅनर्जी कशा काय पडतात??, किंवा त्यांना लागते??, किंवा त्यांचा पाय गाडीच्या दरवाज्यात अडकतो??, वगैरे सवाल करून अनेकांनी ममतांना हैराण केले. त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले. पण ते केवळ 2021 च्याच निवडणुकीपुरते उरले नाही, तर ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील पुन्हा निर्माण झाले. त्यामुळेच वर शीर्षक दिले, उठा उठा निवडणूक आली, पडून जखमी होण्याची वेळ झाली!!

Mamata banerji’s political habit to get injured during elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात