पवार काका – पुतण्याचे “बाहेरून” भांडण “आतून” ते एकच, लोकांना फसवणारे; राज ठाकरेंनी काढले वाभाडे!!

Sharad pawar and ajit pawar's quarrel is fake, they are not divided but they are "one" from inside, slams raj thackeray

विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्रात जातीपातीचे विष कालवणारे पवार – काका पुतणे यांचे बाहेरून भांडण असले, तरी आतून ते एकच आहेत. ते लोकांना फसवणारे आहेत. निवडून येणाऱ्यांची मोळी बांधण्याचे पवारांनी आत्तापर्यंत केले. यापुढेही ते तसेच करत राहणार आहेत, अशा शब्दांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार काका – पुतण्यांचे वाभाडे काढले!! Sharad pawar and ajit pawar’s quarrel is fake, they are not divided but they are “one” from inside, slams raj thackeray

मनसेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जनसंबोधन केलं. या भाषणात राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला.

बाहेर वेगळे, पण आतून सगळे एकच

राज म्हणाले, राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्यांनी सांगताना आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत असे सांगितले म्हणून मी त्यांना कोणत्या गटाचे विचारले तर, त्यातले तीन शरद पवार, दोन अजित पवार गटाचे होते, पण भेटायला मात्र एकत्र आले होते. माझे ठाम मत आहे, हे सर्व आतून एकच आहेत. वेगळे झाल्याचे भासवून ते लोकांना फसवत आहेत!!

‘पवार हेच करत आलेत’

राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावरही टी केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळात पक्षच नाही, ती निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक अजून का झाले नाही??

विरोधक म्हणतात सुरुवात करतात शेवट करत नाही, या आरोपांवर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का झालं नाही. पंतप्रधान आले फुलं वाहून गेले, त्या फुलांंचं काय झालं. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल याचा पुतळा उभा राहिला. मनसे सुरू करते तसा शेवटही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती आहे. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले. प्रार्थना करू नका, असं आम्ही म्हणत नाही, पण भोंग्यांचा आवाज बंद झाला, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘माझ्या हातात सरकार द्या सर्व भोंगे काढतो’

डरपोक सरकार आहे. मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. माझ्या हातात सरकार द्या सर्व भोंगे काढतो. समुद्रात दर्गा बांधला, तो एका रात्रीत काढला. प्रार्थना करू नको असे आम्ही म्हणतो का, एका जातीचा प्रश्न नाही, प्रत्येक राज्यातील पजातीचा प्रश्न आहे.

येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का?

अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला, तेव्हा मी सांगितले असं होणार नाही. समुद्र आहे, तिथे भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गड-किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू, असे राज ठाकरे यांनी सांगितले

Sharad pawar and ajit pawar’s quarrel is fake, they are not divided but they are “one” from inside, slams raj thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात