INDI आघाडीत बाकी सगळ्या पक्षांकडून धुत्कारल्या गेलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने जवळ घेतले. त्यामुळे राहुल गांधींची काँग्रेस “धन्य धन्य” झाली. Samajwadi party and Congress comes together to avoid Muslim vote bank split in UP
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी फटकारले बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दूर सारले. महाराष्ट्रात काँग्रेसचेच नेते फुटले. तामिळनाडूत पक्षाचे भवितव्य झोपले. एवढे सगळे राहुल गांधींची भारत जोडो न्याय प्रत्यक्ष रस्त्यावर असताना घडले. त्यामुळे काँग्रेस “गळून” गेली होती. नेत्यांमधले चैतन्य हरपले होते. पण उत्तर प्रदेशात अखिलेश यादव हे मसीहासारखे धावून आले आणि त्यांनी काँग्रेसला हात देऊन राजकीय कर्दमातून वर काढले.
उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी 80 पैकी 17 जागांवर बोळवण करून अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपल्या समाजवादी पार्टीच्या आघाडीत घेतले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या जीवात जीव आला. मोदींशी टक्कर घेण्याची थोडीफार तरी आशा उत्पन्न झाली. उत्तर प्रदेशात 80 पैकी 17 जागा म्हणजे काठावर पास नसलेल्या अवस्थेत देखील काँग्रेस नेत्यांच्या दंडात बेटकुळ्या भरल्या गेल्या. ते खुश झाले.
काँग्रेस नेते जरी उत्तर प्रदेशातल्या आघाडी बद्दल खुश झाले असले, तरी त्यांच्या खुशीचे “रहस्य” काहीसे वेगळेच आहे आणि ते म्हणजे उत्तर प्रदेशातल्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या अमेठी आणि रायबरेली या जागांमध्ये जागांवर लढत देण्याच्या स्थितीत काँग्रेस आली. अन्यथा समाजवादी पार्टीने काँग्रेसशी आघाडी केली नसती, तर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघांमध्ये काँग्रेसने “”यशस्वी”, तर सोडाच पण “साधी” लढत तरी दिली असती का??, याविषयी फार मोठी शंका आहे.
पण अखिलेश यांच्या रूपाने या दोन्ही मतदारसंघांमध्ये यादव + मुस्लिम व्होट बँक काहीशी ताब्यात आल्याची धारणा काँग्रेस नेत्यांनी करवून घेतली आणि ते आता खुशीची गाजरे खात आहेत.
पण त्यापलीकडे जाऊन अखिलेश यादव यांनी देखील राजकीय अपरिहार्यतेपोटीच काँग्रेस सारख्या पक्षाला बुडत चाललेल्या पक्षाला हात देऊन वर काढले आहे आणि उत्तर प्रदेशातल्या यादव + मुस्लिम व्होट बँक कॉम्बिनेशन त्यात खरे रहस्य दडले आहे. त्यातही मुस्लिम व्होट बँक नावाच्या हवेतल्या संकल्पनेचे “रहस्य” त्यामध्ये विशेषत्वाने दडले आहे.
समाजवादी पार्टीच्या राजकीय यशाचे रहस्य मुस्लिम + यादव व्होट बँकेत असल्याचे त्यांचेच नेते मानत असत. ज्यावेळी उत्तर प्रदेशात जातीनिष्ठ राजकारणाने कळस गाठला होता, तेव्हा ते “सत्य” होते, पण हिंदुत्वाच्या राजकीय उदयानंतर ते “सत्य” हळूहळू विरळ होत गेले. याचा अर्थच यादव + मुस्लिम व्होट बँक नावाचे “राजकीय मिथक” संपुष्टात येत गेले आणि समाजवादी पार्टीचा राजकीय पाया ढासळत गेला. 2014, 2017 आणि 2019, 2022 या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी आणि आकडेवारी याची साक्ष देते.
समाजवादी पार्टीला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18.11 % मते मिळून 5 जागांवर विजय मिळवता आला होता, पण 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या मतदानाची टक्केवारी 32.6 % पोहोचून पक्षाला विधानसभा विधानसभेतल्या 111 जागा मिळवता आल्या होत्या.
त्या उलट 2019 च्या लोकसभा निवडणुकीतला काँग्रेसचा काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आधीच्या म्हणजे 2014 च्या निवडणुकीत पेक्षा घटून ती सिंगल डिजिट मध्ये आली होती. 2014 मध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 12.31 % मते मिळाली होती, तर 2019 मध्ये ती घटून फक्त 6.36 % आली होती. काँग्रेसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या विजयाचे डिजिट सिंगलच राहिले होते. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे मुस्लिम व्होट बँकेवर असलेले अवलंबित्व आणि अस्तित्व संपुष्टात आले होते. आणि इथेच खरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची आघाडीचे आघाडीच्या “पॉलिटिकल कंपल्शनचे” रहस्य आहे.
सतत जातीनिष्ठ राजकारण करणे जाती-जातींच्या मतांच्या बेरजा किंवा वजाबाक्या करत राहणे आणि त्यातून मतांची टक्केवारी मर्यादित करून घेणे, हे काँग्रेस सारख्या राष्ट्रीय आणि समाजवादी पार्टी सारख्या निमराष्ट्रीय पक्षाचे राजकारण राहिले होते. ते 20 – 22 वर्षे धकून गेले, पण नंतर उघडे पडले. कारण यादव + मुस्लिम व्होट बँकेला पर्यायी ठरणारी प्रचंड मोठ्या आकाराची “हिंदू व्होट बँक” टप्प्याटप्प्याने आकाराला आली. भाजपच्या चाणक्यांनी प्रयत्न करून हिंदू व्होट बँक मजबुतीने बांधली. परिणामी 2014, 2017, 2019 आणि 2022 अशा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपच्या मतांची टक्केवारी 40 % ते 43 % पर्यंत वाढत राहिली.
आता या टक्केवारीला छेद देण्यासाठी किंबहुना स्वतःच्याच उरल्या सुरल्या मतांची टक्केवारी टिकवून ठेवण्यासाठी अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि राहुल गांधींची काँग्रेस पार्टी यांनी उत्तर प्रदेशात “राजकीय लग्न” लावून घेतले आहे. INDI आघाडीतल्या या दोन घटक पक्षांच्या “राजकीय लग्ना”चे हे खरे रहस्य आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App