या निवडणुकीत एनडीए सरकार 400चा आकडा पार करेल असंही म्हणाले
विशेष प्रतिनिधी
हरियाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवारी हरियाणातील रेवाडी दौऱ्यावर आहेत. त्यांनी हरियाणाला करोडो रुपयांची भेट दिली आहे, तसेच हरियाणातील रेवाडी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची पायाभरणी केली आहे.Modi lays foundation stone of AIIMS in Haryana Strong target on Congress
यावेळी मोदी म्हणाले की, हरियाणात विकास वेगाने सुरू आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला आहे. जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे गैरकारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेवाडीमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सर्वत्र मोदींच्या हमीभावाची चर्चा होत आहे. आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव दिला आहे. आज हरियाणाचा विकास वेगाने होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, या निवडणुकीत एनडीए सरकार 400चा आकडा पार करेल.
आपल्या भाषणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात काँग्रेसने अडथळे निर्माण केले आहेत. काँग्रेसने देशातील जनतेशी खोटे बोलून त्यांची फसवणूक केली. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेस नेते स्टार्टअप हाताळू शकत नाहीत. काँग्रेसची निष्ठा एका घराण्याशी आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड घोटाळ्यांचा आहे. काँग्रेसला देशाने नाकारले आहे. काँग्रेसकडे कार्यकर्तेही शिल्लक नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App