
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे यंदा नोकरदारांना मागील 3 वर्षांतील सर्वाधिक व्याजदर मिळणार आहे.increase in interest rate of PF for employees
ईपीएफओने सन 2023-24 साठीच्या पीएफ ठेवींवर 8.25 % व्याजाची घोषणा केली आहे. मागील वर्षी 28 मार्च रोजी ईपीएफओने सन 2022-23 साठी 8.15 % दर जाहीर केला होता. 2021-22 रोजी हाच दर 8.10 % इतका होता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगारार कर्मचाऱ्यांसाठीचं अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त, नोकरी देणाऱ्या कंपन्यांकडूनही ईपीएफ खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे. सरकारी सेवानिवृत्ती निधी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ईपीएफओचे एकूण 6 कोटींहून अधझिक सदस्य आहेत. दर महिन्याला, कर्मचारी त्यांच्या कमाईच्या 12 % रक्कम त्यांच्याच नावाने असलेल्या EPF खात्यात योगदान म्हणून देतात. नोकरी देणाऱ्या कंपन्या केवळ 3.67 % ईपीएफ खात्यात जमा करतात, उर्वरित 8.33 % रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून वाटप केले जाते.
increase in interest rate of PF for employees
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
- भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत – मोदी
- PSU शेअर्सवर मोदींची हमी! पंतप्रधानांच्या भाषणानंतर 22 मल्टीबॅगर्स अन् 24 लाख कोटींचा नफा
- सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदला मोठा धक्का बसला, मुलाचा दारुण पराभव