काँग्रेस नावाच्या political magnet च्या दोन्ही ध्रुवांची शक्ती संपली, म्हणून खरी INDI आघाडी फुटली!!

नितीश कुमार यांनी बिहारमध्ये INDI आघाडी फोडून भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी घरोबा करून सरकार बनवले आणि काँग्रेस नावाच्या political magnet ची अर्थात राजकीय लोहचुंबकाच्या दोन्ही ध्रुवांची शक्ती संपली!! याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे.Power of political magnet of Congress has come to an end, therefore INDI alliance splits!!

काँग्रेस नावाच्या राजकीय लोहचुंबकाकडे फार पूर्वी जनतेची मते खेचून घेण्याची जबरदस्त शक्ती होती आणि दुसऱ्या ध्रुवाकडे त्या मतशक्तीच्या आधारे इतर प्रादेशिक पक्षांना वाकविण्याची शक्ती होती. 2014 च्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या राजकीय लोहचुंबकाची जनतेची मते खेचून घेण्याची शक्ती संपली. ती 2019 च्या निवडणुकांमध्ये देखील चालली नाही आणि त्याचवेळी त्या पक्षाची इतर पक्षांना वाकविण्याची शक्ती टप्प्याटप्प्याने संपुष्टात आली. नितीश कुमार यांचे INDI आघाडीतून फुटून बाहेर पडणे हा काँग्रेसच्या राजकीय लोहचुंबकाच्या दोन्ही ध्रुवांची शक्ती संपुष्टात आल्याचा परिणाम आहे, ते साधेसुधे लक्षण नव्हे!!



INDI आघाडी स्थापन करताना काँग्रेसने विशेषतः सोनिया गांधींनी ज्या पद्धतीने पुढाकार घेऊन सर्व विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना एकत्र बांधून आणले होते, त्यांना वेगवेगळ्या बैठकांमध्ये बसवले होते, त्याच्या फोटो अपॉर्च्युनिटीज केल्या होत्या, तो परिणाम वारंवार झालेल्या बैठकांमधून हळूहळू विरळ होत गेला आणि आज अखेरीस तो पूर्ण अस्तंगत झाला. कारण काँग्रेसने INDI आघाडीच्या नेत्यांच्या नुसत्याच “बैठका” घेतल्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने संघटनात्मक पातळीवर “जोर” लावून INDI आघाडीत फूट पाडण्याची राजकीय व्यूहरचना करून व्यवस्थित खेळी केली.

INDI आघाडीतल्या सर्व प्रादेशिक पक्षांना म्हणजे ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला, अगदी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला अथवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा होता आणि आहे, हे निश्चित!! पण त्यासाठी आपापल्या संघटनांच्या जोरावर काँग्रेसला “बळ” देऊन त्यांचे खासदार निवडून आणून काँग्रेसचे सरकार आपल्या डोक्यावर बसवून घेणे हे बिलकुलच परवडणारे नव्हते आणि नाही. त्यामुळेच ज्यावेळी INDI आघाडीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आले, त्याचवेळी नीतीश कुमार यांनी मनाशी खुणगाठ बांधून INDI आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तो आज फक्त त्यांनी अंमलात आणला!!

ममता बॅनर्जींनी देखील राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालच्या वेशीवर येण्याची वाट पाहिली. राहुल गांधींनी आसाम मधून पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करण्याच्या राजकीय मुहूर्तावर ममतांनी बंगाल मधली INDI आघाडी तोडून टाकली.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू इथल्या बड्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आपापल्या पक्षांचा राजकीय रुतबा टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची बिलकुलच गरज नाही. उलट या राज्यांमध्ये स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसला समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूळ काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांची गरज आहे. पण ही गरज न ओळखताच काँग्रेसचे नेते राजकीय वर्तणूक करीत राहिले. मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन INDI आघाडीच्या नुसत्या “बैठका” घेत राहिले, पण प्रत्यक्षात जागा वाटपाचा कोणताच “जोर” न लावता नुसते फोटो काढत राहिले. परिणामी INDI आघाडी कायमची फुटली.

यात भाजपने INDI आघाडी फोडण्याचे राजकारण केले डावपेच खेळले यात कुठलीही शंका असायचे कारण नाही. ते डावपेच खेळलेच, पण त्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे राजकारणात लोणच्यासारखे मुरलेले नेते काही करू शकले नाहीत. हे त्यांचे अपयश अधिक ठळक ठरले. कारण काँग्रेस नावाच्या राजकीय लोहचुंबकाकडे आज जनतेची मते खेचून घेण्याची शक्ती संपली आहे आणि त्यामुळे इतर पक्षांना इतर प्रादेशिक पक्षांकडून वाटेल ती तडजोड करवून घेण्याची क्षमता देखील संपली आहे.

आता जी INDI आघाडी उरली आहे तिच्यात फक्त द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामिळनाडूतलाच पक्ष तेवढा सत्ताधारी उरला आहे. बाकी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल हे सगळे खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष उरले आहेत, की ज्यांना भाजप आपल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत खेचून घेण्याची शक्यता फार कमी आहे.

भाजपला देखील पवार – ठाकरेंचे पक्ष स्वतःच्या आघाडीत खेचण्यात बिलकुल रस नाही. पण INDI आघाडी फोडण्यापुरता आणि त्यातून मोठे राजकीय वातावरण तयार करण्याकरता त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे, तो भाजप करून घेतो आहे. हा राजकारणात मुरलेल्या काँग्रेस नेत्यांसाठी सर्वांत मोठा “राजकीय धडा” आहे, पण हा धडा शिकायची काँग्रेस नेत्यांची अजिबात तयारी नाही, हे खरे काँग्रेसचे आजचे राजकीय दुखणे आहे!!… बाकी नितीश कुमार हे राजकीय रंग बदलणारा सरडा आहेत, हे कितीही खरे असले, तरी काँग्रेस नेत्यांची तशी वक्तव्ये मात्र हवेत सोडलेले राजकीय बुडबुडे ठरले आहेत!!*

Power of political magnet of Congress has come to an end, therefore INDI alliance splits!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात