विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूप्रसादांबरोबरचे आपले राजकीय संबंध संपवले आणि बिहारचे सरकार पाडले त्यामुळे बिहार मधले INDI गठबंधन तुटले, पण एक गटबंधन तुटण्याचे खापर मात्र नितीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाने काँग्रेस मधल्या caucus वर म्हणजे सत्तापिपासू चौकडीवर फोडले. JDU on congress caucus INDI
काँग्रेसमधल्या सत्तापिपासू चौकडीने “इंडिया” आघाडीचे नेतृत्व हडपण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला देशाच्या राजकारणात पुन:स्थापित करण्यासाठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, पण काँग्रेसने मात्र प्रादेशिक पक्षांचा विश्वासघात करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विरोधात लढून सत्ता मिळवली, असा आरोप संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
खरे तर नितीश कुमार हेच “इंडिया” आघाडीचे प्रवर्तक होते. पाटणा, मुंबई मधल्या बैठकांमध्ये त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्या बैठकांमध्येच हे ठरले होते की, “इंडिया” आघाडी कुठलाही चेहरा समोर न आणता निवडणुकीला सामोरे जाईल. परंतु, काँग्रेस मधल्या सत्तापिपासू चौकडीने एक षडयंत्र रचून ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या करवी मल्लिकार्जुन खर्गे यांचा चेहरा समोर आणला. हा प्रादेशिक पक्षांचा विश्वासघात होता. त्यामुळे नितीश कुमार यांना “इंडिया” आघाडीतून बाहेर पडावे लागले. या सर्व घटना क्रमाला काँग्रेसचे सत्ता हडपणारी चौकडीच जबाबदार आहे, असा आरोप के. सी. त्यागी यांनी केला.
पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश वगैरे राज्यांमध्ये आणि भागांमध्ये वेगवेगळे प्रादेशिक पक्ष बळकट असताना काँग्रेसने तिथे कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. काही ठिकाणी सत्ता मिळवली आणि बहुतेक ठिकाणी सत्ता गमावली, पण काँग्रेसच्या नेत्यांचे डोळे उघडले नाहीत. त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या ताकदीच्या बळावर स्वतःचेच नेतृत्व लादायचा प्रयत्न केला, असे शरसंधान त्यागी यांनी साधले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App