मराठा आरक्षणावर शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयाशी नारायण राणे असहमत; उद्या पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणावर शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असहमती दर्शवली आहे. ते उद्या 29 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली स्वतंत्र भूमिका मांडणार आहेत. The role will be presented tomorrow with a press conference: rane

मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर राज्यातल्या महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणे यांच्यासारख्या हेवीवेट केंद्रीय मंत्र्यांनी असहमती दर्शवल्याने मराठा आरक्षण मुद्द्याला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.

मराठा समाजातल्या सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावर नारायण राणे यांनी आधीच असहमती दर्शवली होती, पण शिंदे – फडणवीस सरकारने अध्यादेश काढून सरसकट नव्हे, तर ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्यांना आणि पितृसत्ताक पद्धतीने सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात स्पष्ट खुलासा करून जे कुणबी आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करतील आणि गृहचौकशीत पात्र ठरतील, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले.

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी ट्विट करून आपण राज्य सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर असहमत असल्याचे स्पष्ट केले आहे. ते उद्या 29 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली स्वतंत्र भूमिका मांडणार आहेत.

नारायण राणे यांचे ट्विट असे :

मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन.

The role will be presented tomorrow with a press conference: rane

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात