विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर भव्य रोड शो केला. नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. भाजपने यानिमित्ताने जबरदस्त शक्तीप्रदर्शन संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार हे देखील मोदींसोबत त्यांच्या गाडीत स्वार झाले होते. रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी पूजन केले. Modi’s grand road show in Nashik
काळाराम मंदिराचे दर्शन
रोड शोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. काळाराम मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि लेझीम पथक प्रदर्शन करीत आहे. 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नाशिक मध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो, त्याचप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचे देखील नियोजन आहे. नरेंद्र मोदी हे रामकुंड या परिसरात येणार असल्याने रामकुंडाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली.
त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराचे महत्त्व वाढले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान रामकुंड या ठिकाणी येत असल्याने, याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App