विशेष प्रतिनिधी
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना परळीच्या वैद्यनाथ कारखाना प्रकरणात आणखी एकदा धक्का बसला. 203 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी युनियन बँकेने या कारखान्याचा ई- लिलावाची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी ठेवली आहे. यासंदर्भात पंकजा यांनी मौन बाळगले आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी 19 कोटींच्या थकीत करापोटी जीएसटी विभागानेही या कारखान्यावर कारवाई केली होती.Vaidyanath factory for sale due to loan of 203 crores; Process initiated by Union Bank
पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी काही कारखान्यांना अर्थसाह्य केले होते, मात्र त्यात प्रस्ताव देऊनही पंकजांना नाकारले होते. त्यामागे भाजपचे अंतर्गत राजकारण असल्याची चर्चा होती. आता यात ‘पॅचअप’च्या भूमिकेत असलेल्या पंकजांवर पुन्हा नवे संकट उद्भवले आहे.
कारखान्यासह 91 हेक्टर जमिनीचाही होणार लिलाव
कारखान्याच्या कौठाळी व पांगरी येथील 67 हेक्टर शेतजमिनीसह याच दोन गावांतील 24 हेक्टर बिगरशेती जमिनीचाही लिलाव होणार आहे. यासह शुगर प्लँटची कारखाना इमारत, जुना डिस्टिलरी प्रकल्प, नवा डिस्टिलरी प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, निवासी क्वार्टर्स, जनरेशन प्लँट व प्लँट मशिनरींचा लिलाव होणार असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे. मशिनरी व प्लँटची राखीव किंमत 62 कोटी 25 लाख रुपये आहे, तर जमीन व इमारतीची राखीव किंमत 45 कोटी 86 लाख रुपये असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App