अधीर रंजन यांनी ममतांवर I.N.D.I.A आघाडी बिघडवल्याचा केला आरोप

एवढच नाही तर तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला भाजपचे दलालही म्हटलं 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, I.N.D.I.A. आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमेकांना दलालासारखे शब्द वापरले जात आहेत. एकीकडे शिवसेनेने (उबाठा) महाराष्ट्रात २३ जागांवर दावा केला आहे, तर दुसरीकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. Adhir Ranjan accused Mamtawar INDIA Aghadi of corruption

तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी यांनी एका बैठकीत I.N.D.I.A. आघाडीच्या जागावाटपावर चर्चा करताना, CPM आणि काँग्रेसचे वर्णन भाजपचे दलाल म्हणून केले आहे. 400 जागांवर जागावाटप झाले तर भाजप 200 च्या खाली जाऊ शकते, असे सुदीप बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तसेच काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणे बाकी असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशात काँग्रेस अखिलेश यांना सोडणार का? बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमारांना सोडणार का? ते बंगालमध्ये ममतांना सोडणार का? आणि अरविंद केजरीवाल यांना पंजाब आणि दिल्लीत सोडणार का?

मुर्शिदाबादचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडी बिघडवली आहे, दीदींनाच आघाडी नकोय. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हट्ट केला तर त्या स्वतःच अडचणीत येतील. बंगालमध्ये कोण येतंय आणि कोण सोडतंय, याची आम्हाला काहीच अडचण नाही, बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची ताकद काँग्रेसकडेच आहे. ते म्हणाले की, आमची सत्ता असेल तिथे आम्ही निवडणूक लढवणार हे आमच्यासाठी स्पष्ट आहे.

Adhir Ranjan accused Mamtawar INDIA Aghadi of corruption

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात