विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार 2022 मध्ये 3570 किलोमीटर दक्षिणोत्तर चालले. कर्नाटक आणि तेलंगण ही राज्ये काँग्रेसने जिंकली, पण पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यासह पाच राज्ये काँग्रेसने गमावली. राहुल गांधी आता भारत न्यायात्रेत पूर्व पश्चिम 6200 किलोमीटर चालणार आहेत, त्यामुळे 2024 चा निकाल नेमका कसा आणि काय लागेल??, असा सवाल तयार झाला आहे.Rahul Gandhi marched 3570 kms to the north-south won 2 states, lost 5; Now East-West will run 6200 kilometers; What will be the result??
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि 20 मार्चला मुंबईत संपेल. या कालावधीत या यात्रेत 14 राज्यांचा समावेश आहे. राहुल गांधी बसने आणि पायी 6200 किलोमीटर प्रवास करणार आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्ष भारत न्याय यात्रा काढणार आहे. राहुल गांधी हे या यात्रेचा प्रमुख चेहरा असतील.
ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमार्गे महाराष्ट्रात संपेल.
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला १४५ दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपला. त्यानंतर राहुल यांनी 3570 किलोमीटरच्या प्रवासात 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश कव्हर केली. प्रत्यक्ष निवडणूक निकालात त्याचे प्रतिबिंब कर्नाटकाने तेलंगणात दिसले कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसने सत्ता मिळवली, तर तेलंगणात भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांचा पक्षाचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर आले पण त्या पलीकडे जाऊन पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यांमध्ये मात्र काँग्रेसने सत्ता गमावली.
त्यामुळे राहुल गांधी पूर्व-पश्चिम 6200 किलोमीटर चालणार तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणार पण आव्हान नेमके कोणाला देणार हा सवाल तयार झाला आहे कारण राहुल गांधीच्या राज्यांमधून प्रवास करणार आहेत तिथे तर प्रामुख्याने भाजप पेक्षा अन्य प्रादेशिक पक्षांची सरकारेच बळकट आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App