वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (21 डिसेंबर) सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने चार जवान शहीद झाले आणि दोन तीन जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. errorists attack 2 army vehicles, 4 jawans martyred, PAFF takes responsibility
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरनकोट पोलीस ठाण्यांतर्गत ढेर की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या वळणावर दुपारी 3.45 च्या सुमारास सैनिकांना घेराव आणि शोध मोहिमेच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या एका शाखेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
#WATCH | Security heightened at the Jammu-Rajouri-Poonch highway after the terrorist attack on two military vehicles in the Thanamandi area in the Rajouri sector. https://t.co/tpArIiVtYi pic.twitter.com/uBkM3V3byZ — ANI (@ANI) December 21, 2023
#WATCH | Security heightened at the Jammu-Rajouri-Poonch highway after the terrorist attack on two military vehicles in the Thanamandi area in the Rajouri sector. https://t.co/tpArIiVtYi pic.twitter.com/uBkM3V3byZ
— ANI (@ANI) December 21, 2023
हल्ला कुठे झाला?
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात हा हल्ला झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-राजौरी-पुंछ महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय लष्कराच्या जवानांनीही लगेच प्रत्युत्तर दिले. बुधवारी (20 डिसेंबर) सायंकाळपासून या भागात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील संयुक्त मोहिमेला सैनिक बळकट करणार होते. 48 राष्ट्रीय रायफल्स परिसरात ही कारवाई सुरू आहे.
पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या शाखेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संरक्षण प्रवक्त्याने दिली हल्ल्याची माहिती
जम्मू स्थित संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत मिळालेल्या भक्कम गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी रात्री पूंछ जिल्ह्यातील थानामंडी-सुरनकोट भागातील ढेरा की गली या सामान्य भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
ते म्हणाले की, सैन्य दल घटनास्थळाकडे जात असताना दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर गोळीबार केला – एक ट्रक आणि एक जीपवर हल्ला झाला. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, सैन्याने या हल्ल्याला तत्काळ प्रत्युत्तर दिले.
सध्या सुरू असलेल्या कारवाईत चार जवान शहीद झाले असून तीन जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिराही ही कारवाई सुरू होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App