नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदनिष्ठ गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून भाजपच्या 2024 च्या निवडणुकांच्या रणनीतीवर भाष्य केले. त्यांना म्हणे, एक माहिती समजली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यात महाराष्ट्रात ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना बाजूला करून नव्यांना निवडणूक लढवण्याची संधी देण्याचे ठरले. त्याचबरोबर महायुतीत आलेल्या सगळ्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर तिकीट लढविण्याचा आग्रह धरावा. जे मान्य करतील त्यांना तिकीट द्यावीत आणि जे अमान्य करतील त्यांना जाऊ द्यावे, असे त्या बैठकीत ठरले आणि ही माहिती जितेंद्र आव्हाडांच्या भाजप मधल्या मित्रांनी त्यांना सांगितली, असा आव्हाडांचा दावा आहे. भाजपचा “तत्वनिष्ठ मतदार” पक्षावर नाराज असल्याचा जावई शोधही आव्हाडांनी पोस्टमध्ये लिहिला आहे Jitendra avahd claimed BJP will compell its allies to contest on lotus sybol
पण त्या पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाडांनी एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आपल्या पोस्टमध्ये केले आहे. ते म्हणजे, महाराष्ट्रात 2019 मध्ये जे घडले, ते भाजप पुन्हा घडू देणार नाही. त्यामुळे त्यामुळेच ते आपल्याबरोबर असणाऱ्यांना म्हणजेच मित्र पक्षांना कमळ चिन्हावर लढवणे भाग पडणार पाडणार आहेत. जितेंद्र आव्हाडांची ही सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे.
पण ज्या जितेंद्र आव्हाडांना स्वतःच्या शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगात नेमके काय होणार आहे??, याची खात्री देता येत नाही, ते आव्हाड भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत आपण स्वतःच जणू काही हजर होतो, असे ठासून सांगत भाजपची स्ट्रॅटेजी उघड करण्याचा आव आणतात, याचा नेमका अर्थ काय??, याचा बारकाईने विचार केला तर दोनच बाबी संभवतात.
पहिली म्हणजे आपल्या पोस्ट मधून आव्हाड भाजपबरोबर गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन गटांमध्ये संशयाचा साप सोडून देतात आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्रात भाजप विरोधी विशिष्ट वातावरण तापवायचा प्रयत्न करतात.
शरदाचे चांदणे फिके
पण त्याही पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाड या पोस्ट मधून एक कबुली देतात, ती म्हणजे ज्या अर्थी महाराष्ट्रात भाजप 2019 पुन्हा घडू देणार नाही, याचा अर्थ 2024 मध्ये शरदाचे चांदणे फिके पडण्याचीच “कबुली” आव्हाड देतात. कारण 2019 मध्ये शरद पवारांनी तर उद्धव ठाकरे यांना भाजप पासून बाजूला करून त्यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवले. त्यांना मुख्यमंत्री केले आणि भाजप – शिवसेना महायुतीला बहुमत असूनही भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले.
पण आता 2024 मध्ये भाजप पुन्हा 2019 घडवू देणार नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यावेळी ते शरद पवारांचे 2019 चे फोडाफोडीचे कौशल्य पुन्हा उपयोगी पडणार नाही, याचीच कबुली देतात ना…!! जितेंद्र आव्हाडांच्या सोशल मीडिया पोस्टचा हाच खरा अर्थ होतो… पण आपणच दिलेली ही “कबुली” जितेंद्र आव्हाड यांना 2024 ची निवडणूक पार पडेपर्यंतच्या भविष्यात “मान्य” होणार आहे ना??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App