अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध बिघडणार नाहीत, असंही मोदी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेत खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, “आम्हाला कोणी काही माहिती दिली तर आम्ही त्याकडे नक्कीच लक्ष देऊ.”PM Modi broke silence on Pannus murder conspiracy in America
तसेच यासंदर्भात सादर केलेल्या कोणत्याही पुराव्याची चौकशी करण्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. छोट्यामोठ्या घटनांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध बिघडणार नाहीत, असेही ते म्हणाले.
मुलाखतीत मोदी म्हणाले की, ”जर आम्हाला कोणी माहिती दिली तर आम्ही त्याची नक्कीच चौकशी करू. आमच्या नागरिकांचा सकारात्मक किंवा नकारात्मक कृतीत सहभाग असला तरी आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार आहोत. आम्ही कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समर्पित आहोत.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App