संसद संकुलातील वर्तनात सभ्यतेच्या मर्यादा पाळा; उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या खासदारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कानपिचक्या!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळा. जनतेच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या विसरू नका, अशा परखड शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू यांनी उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या खासदारांना कानपिचक्या दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी ट्विट करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.observe the bounds of civility in behavior in the Parliament complex; President Draupadi Murmu’s ears to the MPs who insulted the Vice President!!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रमुख काँग्रेसचे राज्यसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर काल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली त्यांची खिल्ली उडवली त्यांना रोखणे ऐवजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला त्यावेळी सगळे विरोधी पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याभोवती जमून खिदळत होते. खासदार पदाच्या सभ्यतेच्या मर्यादा लाज आणणारे हे चित्र होते.



उपराष्ट्रपतींच्या या अपमानाची राष्ट्रपतींनी दखल घेतली आणि खासदारांना कानपिचक्या दिल्या.

आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात

संसदेच्या संकुलात आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्याप्रकारे अपमान करण्यात आला, ते पाहून मला खूप वाईट वाटले. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेण्याची जरूर मोकळीक असली पाहिजे, परंतु त्यांची अभिव्यक्ती सन्मान आणि सौजन्याच्या निकषांमध्ये असली पाहिजे. ही संसदीय परंपरा आहे, ज्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतीय जनता लोकप्रतिनिधींकडूनही तशाच वर्तनाची अपेक्षा राखते.

उपराष्ट्रपतींच्या अपमानाची थेट राष्ट्रपतींनी दखल घेऊन त्याबद्दल ट्विट केल्याने आता संसद सचिवालय आणि सरकार नेमके कोणते पाऊल उचलते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

observe the bounds of civility in behavior in the Parliament complex; President Draupadi Murmu’s ears to the MPs who insulted the Vice President!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात