जुनीच उदाहरणे देऊन शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर; पण बोचऱ्या सवालांवर नाही दिले उत्तर!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवारांचे समारंभाचे भाषण मीडिया आणि सोशल मीडियात गाजले. त्या भाषणात अजित पवारांनी तारीख वार तपशील देत शरद पवारांवर नेमक्या शब्दात शरसंधान साधले होते. त्यांना नेमके बोचरे प्रश्न विचारले होते. त्यावर आज अजित पवारांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी जुनीच उदाहरणे दिली, पण अजितदादांच्या कोणत्याही नेमक्या आणि बोचऱ्या सवालाला प्रत्युत्तर दिले नाही. Sharad Pawar’s reply to Ajit Dada by giving old examples

फक्त काही लोक वेगळा विचार करून गेले पक्ष स्वच्छ झाला. लोकांना संधी मिळेल, असे वेचक वेधक वक्तव्य पवारांनी केले.

कर्जतमध्ये अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. शरद पवार यांनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केले. पवारांनी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरूण लाड आणि आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले :

कुणी पक्ष सोडून गेलं असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. शेवटी जनतेत जे भूमिका मांडून पाठिंबा घेण्यासाठी यशस्वी होतात, जनताही त्यांच्याबरोबर राहते. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळेल.

माझ्याबरोबर 60 आमदार निवडून आले होते, त्यापैकी फक्त 6 माझ्याबरोबर राहिले, पण नंतरच्या निवडणुकीत त्यातले 50 ते 52 आमदार पडले आणि तेवढेच नवीन निवडून आले, हे जुनेच उदाहरण पवारांनी दिले.

महाराष्ट्रात नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे. ही युवकांची संघटना मजबूत करू शकलो, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक फळी मोठ्या मतांनी निवडून येईल.

काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले, टीका-टिप्पणी केली. बाहेर पडलेल्यांनी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला. पण, खूप विचार करण्याची गरज नाही. जनता प्रश्न विचारेल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी टीका केली जाते. सत्ता येते, जाते. मात्र, जनता तुम्ही कुठून निवडून आला, तुमचं पक्षचिन्ह, तुमचा कार्यक्रम याचा विचार करते. त्यामुळे जागरूक जनता महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत परिवर्तन करण्याची धमक समाजात असते. परिवर्तनाचा कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे.

तीन-चार महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे. पक्षानं ठरवलेला मतदारसंघ निवडून आणण्यासाठी पुढील पावले टाकली पाहिजेत.

अजित पवारांचे सवाल

शपथविधीपूर्वी आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वेळोवेळी पूर्वकल्पना दिली होती. मात्र, त्यांनीच आम्हाला सातत्याने गाफील ठेवले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता.

“राजीनामा द्यायचा नव्हता, तर…”

२ मे ला शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम झाला. तेव्हा शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. याची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती. पवारांनी राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदाची निवड करायची, असे ठरले होते. राजीनामा दिल्यावर पवार घरी गेले. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना राजीनामा मागे घ्यावा म्हणून चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही ठराविक टाळकी तेथे ठाण मांडून बसली होती, जर राजीनामा द्यायचा नव्हता तर ही नौटंकी कशाला केली??,” असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

१७ जुलैला आम्हाला का बोलावले?

पक्षाच्या खासदार आणि आमदारांनी २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले?? आधी मंत्र्यांना बोलवले, नंतर आमदारांना बोलवले नंतर सगळं सुरळीत होणार आहे, असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले. १२ ऑगस्टला उद्याोगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. निर्णय घ्यायचा नव्हता तर तेव्हा पण गाफील का ठेवले??, एक घाव दोन तुकडे का नाही केले??, असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला होता.

यापैकी एकाही सवालाला शरद पवारांनी निसर्ग मंगल कार्यालयातल्या आपल्या संबोधनात प्रत्युत्तर दिले नाही.

Sharad Pawar’s reply to Ajit Dada by giving old examples

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात