विशेष प्रतिनिधी
बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी एक शाळा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोर आहे.15 schools in Bengaluru received bomb threat
डीके शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, “मी टीव्ही पाहत होतो, माझ्या घरासमोरील शाळेलाही धमकीचा मेल आला होता. मी येथे चौकशी करण्यासाठी आलो आहे.”
यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास शाळांची तपासणी केली जात आहे. तसेच ज्या शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या त्या सर्व शाळांमध्ये बॉम्ब निकामी पथके पाठवण्यात आली आहेत. ज्या शाळांना ही धमकी मिळाली आहे त्यात व्हाईटफिल्ड, कोरमंगला, बसवेशनगर, यालहंका आणि सदाशिवनगर येथील शाळांचा समावेश आहे.
केरळ बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 6 वर; 29 ऑक्टोबर रोजी प्रार्थनेदरम्यान झाला होता बॉम्बस्फोट
घाबरून जाण्याची गरज नाही – सिद्धरामय्या
बंगळुरूमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘पोलीस तपास करतील आणि मी त्यांना तसे निर्देश दिले आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शाळांची तपासणी करून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत. पोलिस विभागाकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App