राजदूत तरनजीत सिंग संधू गुरुद्वारामध्ये गुरुपूरबनिमित्त प्रार्थना करण्यासाठी गेले होते
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना खलिस्तानवाद्यांनी धक्काबुक्की केली. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी न्यूयॉर्कमधील लॉंग आयलंड येथील हिक्सविले गुरुद्वाराला भेट दिली तेव्हा दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या खलिस्तान समर्थकांच्या गटाने त्यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर हल्ला केला. राजदूत तरनजीत सिंग संधू गुरुद्वारामध्ये गुरुपूरबनिमित्त प्रार्थना करण्यासाठी गेले होते. मात्र, घटनेनंतर संधू गुरुद्वारातून निघून गेले. Khalistani crossed the limit Now Indias ambassador to America Taranjit Singh Sandhu is in for a shock
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओनुसार, खलिस्तान समर्थक तरनजीत सिंग संधूंना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. यादरम्यान हे खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर आणि गुरपतवंत सिंग पन्नून या दहशतवादी यांच्याबाबत विधानं करत होते. पन्नूवर हल्ला करण्याचा कट आणि निज्जरच्या हत्येमुळे हे खलिस्तान समर्थक दहशतवादी संतप्त असल्याचं व्हिडिओवरून दिसत आहे.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये, भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू आपल्या वाहनातून गुरुद्वारा परिसर सोडताना दिसत आहेत, तर तिथे उपस्थित असलेल्या एका खलिस्तानी आंदोलकाने गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी ध्वज फडकावला. या घटनेमुळे त्यांना तातडीने गुरुद्वारातून बाहेर पडावे लागल्याचे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App