अखेर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला सोडले पाणी; मराठवाड्यात 2 लाख हेक्टर शेतीला होणार लाभ

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने शुक्रवारी दिले आहेत. त्यानुसार 25 दिवस उशिराने का होईना नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात शुक्रवारी रात्री 10 वाजेनंतर नाशिकच्या दारणा धरणातून 100 क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. नंतर त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येणार आहे. पाठोपाठ नगरच्या धरणातूनही विसर्ग केला जाईल. दरम्यान, हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत 48 तास लागणार आहेत.Finally, water was released to Jayakwadi from Nashik’s Darna Dam; 2 lakh hectares of agriculture will benefit in Marathwada



समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार 30 ऑक्टोबरपर्यंत नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात गोदावरी महामंडळ प्रशासनाने पाणी सोडण्याबाबतचे आदेश 15 दिवस उशिरा काढले. या आदेशाला नगर, नाशिकच्या पुढाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, तिथे स्थगिती मिळाली नाही. पण तरीही पाणी सोडले नव्हते. त्यामुळे मराठवाड्यात जनआंदोलन तीव्र झाले. त्याची 25 दिवसांनंतर शासनाने दखल घेतली. 24 नोव्हेंबरला पुन्हा एकदा गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

असा होईल फायदा

जायकवाडीत सध्या 39 टक्केच पाणी आहे. ऊर्ध्व खोऱ्यांतील धरणाच्या पाण्यामुळे कृषी, उद्योगाची गरज आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होऊ शकेल. त्याचबरोबर रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, फळपिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडणे शक्य होईल.

23 धरणांतून पाणी सोडावे लागणार

ऊर्ध्व खोऱ्यातील 23 धरणांचे पाच समूह. यामध्ये नगर, नाशिकच्या मुळा, मुठा, प्रवरा, गोदावरी-गंगापूर, दारणा, पालखेडचा समावेश होतो. यातून जेथे मुबलक उपलब्धता आहे, तेथून जायकवाडीत पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

दोन टीएमसी पाणी मुरणार

पाणी सोडण्यास 25 दिवस उशीर झाला आहे. त्यामुळे आता 8.6 टीएमसीऐवजी जायकवाडीत प्रत्यक्ष 6.6 टीएमसीच पाणी येईल. उर्वरित दोन टीएमसी पाणी कालव्यात, पात्रात जिरेल.

Finally, water was released to Jayakwadi from Nashik’s Darna Dam; 2 lakh hectares of agriculture will benefit in Marathwada

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात