विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : तुम्ही मला मुख्यमंत्री करा, मी तुमचे प्रश्न सोडवतो, असे म्हणत कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. कोल्हापुरातील एका आंदोलनादरम्यान त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे. संभाजीराजे यांच्या रूपाने आणखी एक “भावी मुख्यमंत्री” शर्यतीत उतरल्याने अन्य भावी मुख्यमंत्र्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. Sambhaji Raje entered the race for the post of Chief Minister
मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातल्या सारथी संस्थेसमोर आंदोलन सुरू केले आहे. गेले 15 दिवस हे आंदोलन सुरू आहे. संभाजीराजे यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना शिष्यवृत्ती प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी मला मुख्यमंत्री करा. मी तुमचे सगळे प्रश्न सोडवतो, असे वक्तव्य केल्याचे समोर आले. झी 24 तास वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
पण संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आत्तापर्यंत अनेक “भावी मुख्यमंत्री” पोस्टर्स वर दिसले. त्यामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचा प्रामुख्याने समावेश राहिला. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे देखील “भावी मुख्यमंत्री” झाले. त्यांच्या पाठोपाठ आता संभाजीराजे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याचे चित्र निर्माण झाले.
जरांगे पाटलांचे आव्हान
या शर्यतीला देखील आता या शर्यतीत संभाजीराजे उतरणे याला देखील विशिष्ट पार्श्वभूमी आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून संभाजीराजे पुढे येत होते. परंतु, दरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू झाले. गेल्या दोन महिन्यांमध्येच जरांगे पाटील अत्यंत वेगाने मराठा समाजाचे नेते म्हणून पुढे आले. त्यांनी अंतरवली सराटीत 10 लाखांची सभा घेऊन दाखवली. त्यांना भेटण्यासाठी स्वतः शाहू महाराज तिथे जाऊन आले. बाकीचे अन्य नेतेही मनोज जरांगेंना मराठा समाजाचा नेता मानू लागले. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांच्या राजकीय आणि सामाजिक महत्त्वाकांक्षाचे काय होणार??, असा सवाल तयार झाला. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.
मध्यंतरीच्या काळात संभाजीराजे यांचे नाशिक दौरे वाढले होते त्यावरून ते आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरून सर्व पक्षांपुढे आव्हान उभे करणार, असे चित्र निर्माण झाले होते. त्यांच्या स्वराज्य पक्षातर्फे ते लोकसभेचे 48 उमेदवार उभे करून महाराष्ट्रात पर्यायी राजकीय पक्ष म्हणून जनतेसमोर येणार असे बोलले जात होते, पण आता ती चर्चा बाजूला पडून संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App