वृत्तसंस्था
पुणे : पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 6 नोव्हेंबर रोजी 7 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सातही आरोपी उच्चशिक्षित असल्याचे 12 नोव्हेंबर रोजी उघड झाले.All seven accused in Pune ISIS module case are highly educated; NIA Disclosure- Talk in codewords to make IEDs
हे लोक नामांकित कंपन्यांमध्ये काम करायचे आणि इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी कोडवर्डमध्ये बोलायचे. एनआयएने कोर्टात 4 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
सल्फ्यूरिक अॅसिडला व्हिनेगर म्हणायचे
आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपींनी सल्फ्यूरिक अॅसिडसाठी व्हिनेगर, हायड्रोजन पेरॉक्साइडसाठी सरबत आणि एसीटोनसाठी गुलाबपाणी असे शब्द वापरले. सल्फ्यूरिक अॅसिड, एसीटोन आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर आयईडी बनवण्यासाठी केला जातो.
याशिवाय वॉशिंग मशिनचा टायमर, थर्मामीटर, स्पीकर वायर, 12 वॅटचा बल्ब, 9 वॅटची बॅटरी, फिल्टर पेपर, माचिस आणि बेकिंग सोडा यासारख्या सहज उपलब्ध वस्तूंचाही आरोपींनी आयईडी बनवण्यासाठी वापर केला.
आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटकात दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी त्यांनी ड्रोनचाही वापर केला होता, तो एजन्सीने जप्त केला आहे.
दिल्ली पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी दहशतवादी शाहनवाजला पकडले
स्पेशल सीपी हरगोविंद सिंग धालीवाल यांनी सांगितले की, शाहनवाजला 2 ऑक्टोबरला सकाळी जैतपूर येथून पकडण्यात आले. त्याच्याकडून आयईडी बनवण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ आणि साहित्य सापडले. शाहनवाजची पत्नी सुरुवातीला हिंदू होती. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून मरियम असे ठेवले. तीही नवऱ्याला साथ देत होती. सध्या शाहनवाजची पत्नी आणि बहीण दोघीही भूमिगत आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
पुणे ISIS मॉड्यूल प्रकरण काय आहे?
या वर्षी 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी शाहनवाज आणि मध्य प्रदेशातील दोन जणांना – मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांना पुण्यातील दुचाकी चोरीप्रकरणी अटक केली होती. पोलीस त्यांना त्याच्या लपून बसलेल्या ठिकाणी चौकशीसाठी घेऊन जात असताना शाहनवाजने पोलिसांच्या गाडीतून उडी मारून पलायन केले.
मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद साकी यांच्या चौकशीदरम्यान हे दोघेही सुफा दहशतवादी टोळीचे सदस्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमध्ये एका कारमध्ये स्फोटके सापडल्याप्रकरणी तेथील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला पुणे ISIS मॉड्यूल केस असे नाव दिले. या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन दहशतवाद्यांना मोस्ट वाँटेड यादीत ठेवले होते. पुण्याचा तल्हा लियाकत खान आणि दिल्लीचा रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख अशी त्यांची नावे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App