विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज धनत्रयोदशीच्या दिवशी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या कुस्तीगीरांना खुशखबर दिली आहे. मल्लांचे मानधन यापुढे देखील वाढविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.Good news for Mallas in Maharashtra on Dhantrayodashi day; Fadnavis’s announcement to increase the salary further
मल्लांचे मानधन वाढविण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला असून राज्य सरकार मल्लांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थिती लावून दिली.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव असून महाराष्ट्राला नामवंत पैलवान याच स्पर्धेतून प्राप्त होतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये ऑलिंपिक आणि आशियाई स्पर्धेत महाराष्ट्रातील मल्ल पदके मिळवतील अशी वाट आपण पाहत आहोत. राज्य सरकार मल्लांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या खुराकापासून ते बक्षिसाच्या रकमेपर्यंत सगळीकडे वाढ करेल. त्यांनी मल्लांनी मेहनत करून महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त परके मिळवावीत, अशा अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App