प्रचाराच्या गाडीला अचानक लागला ब्रेक; मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव टपावरून खाली पडले थेट!!

वृत्तसंस्था

निजामाबाद : प्रचाराच्या गाडीला अचानक लागला ब्रेक मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव टपावरून खाली पडले थेट!!, असे आज तेलंगणात घडले. Chief Minister’s Chiranjeev fell directly from the platform

त्याचे झाले असे :

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव राज्याचे आयटी मंत्री के. टी. रामा राव हे निजामाबाद जिल्ह्यातल्या आरारूर मतदारसंघात प्रचार करत होते. यावेळी ते उमेदवारासमवेत गाडीच्या टपावर चढून लोकांना अभिवादन करत होते. गाडी फार वेगात चालली नव्हती. पण गाडीच्या कपॅसिटी पेक्षा तिच्या टपावर नेत्यांची जास्त गर्दी होती. प्रचाराच्या गाडीबरोबर अन्य गाड्यांचाही ताफा होता यापैकी प्रचाराच्या गाडी समोरची गाडी रस्त्यावर अचानक थांबली. त्यामुळे प्रचाराच्या गाडीच्या चालकाला ब्रेक लावावा लागला, पण अचानक ब्रेक दाबल्यामुळे टपावरची सगळी मंडळी धाडकन खाली आली. त्यामध्ये केटी रामा राव हे देखील होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या राजकीय कमेंट केल्या. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने टपावरून खाली आले, त्याच पद्धतीने तेलंगणातले भारत राष्ट्र समितीचे सरकार सत्तेवरून खाली कोसळणार आहे, अशा खोचक प्रतिक्रिया अनेकांनी लिहिल्या.

ही किरकोळ दुर्घटना वगळता आरारूर मतदार संघातल्या प्रचार के. टी. रामा राव यांनी व्यवस्थित पूर्ण केला आणि ते सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला निघून गेले. पण प्रचाराच्या गाडीला अचानक लागलेला ब्रेक आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना टपावरून खाली यावे लागले थेट, हा तेलंगणाच्या निवडणुकीतला आजचा मुख्य चर्चेचा विषय ठरला.

Chief Minister’s Chiranjeev fell directly from the platform

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात