गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित फरार झाला आहे. त्याच्याकडे एक लांब बंदूक होती
विशेष प्रतिनिधी
लेविस्टन : अमेरिकेत काल (२५ ऑक्टोबर) मेनच्या लुईस्टन शहरात किमान तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. या हल्ल्यात 22 जण ठार झाल्याची माहिती आहे. तसेच सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 50-60 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. Indiscriminate shooting in Lewiston USA 22 dead more than 50 injured
गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित फरार झाला आहे. त्याच्याकडे एक लांब बंदूक होती, ज्याच्या मदतीने तो लोकांवर अंदाधुंद गोळीबार करत होता.
अमेरिकन न्यूज एबीसीच्या वृत्तानुसार, वॉलमार्ट सेंटरसह बॉलिंग एली, स्थानिक बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. तपासकर्ते अजूनही गुन्ह्याचे ठिकाण तपासत आहेत आणि पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App