भव्य शेतकरी मेळाव्यासही संबोधित करणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येणार आहेत. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणासह अन्य विविध प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. याशिवाय मोदींच्या उपस्थितीत भव्य अशा शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचं महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. Prime Minister Modi will come to Shirdi today to inaugurate various projects including Nilavande Dam
या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह मंत्री, आमदार, खासदार आणि मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.
शिर्डीत आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम मोदी श्रीसाई मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि संस्थानच्यावतीने उभारलेल्या दर्शन रांगेचे उद्घाटन करणा आहेत. यांनी पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे येथे जलपूजन करून धरणाचे लोकार्पण केले जाणार आहे. पुढे दुपारी काकडी येथील कार्यक्रमासाठी मोदी पोहचतील. दूरदृष्य प्रणालीद्वारे नगर येथील आयुष रुग्णालयाचे उद्घाटन व महिला आणि बाल रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ, उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाच्या कामाची सुरुवात आणि राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘नमो किसान सन्मान योजने’चा प्रारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App