22 जानेवारी 2024 : राम जन्मभूमी मंदिर उद्घाटनाचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे या दिवशी मंदिरातील गर्भगृहात श्री राम लल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी जाऊन दिले. ट्रस्टचे पदाधिकारी चंपत राय, राम जन्मभूमी निर्माण मंदिर निर्माण समितीचे प्रमुख, पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा, उडपीचे शंकराचार्य आणि स्वामी गोविंद देव गिरी हे उपस्थित होते. Invitation to Prime Minister Modi to Inaugurate Ram Janmabhoomi Temple

22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी राम लल्लांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे. त्यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होतील.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या निमंत्रणाची माहिती दिली. काल विजयादशमीनिमित्त राजधानी दिल्लीत द्वारका मध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचे निर्माण पूर्ण होत आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना मंदिराच्या उद्घाटनाचे आणि राम लल्लांच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

Invitation to Prime Minister Modi to Inaugurate Ram Janmabhoomi Temple

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात