UNSCमध्ये पाकिस्तानने पुन्हा केला काश्मीरचा उल्लेख ; जाणून घ्या, भारताची काय प्रतिक्रिया?

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दहशतवादावर केली टिप्पणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्रायल-गाझा परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा  केलेल्या उल्लेखास कोणतंही महत्त्व देणार नसल्याचं भारताने म्हटले आहे.   संयुक्त राष्ट्रातील भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र यांनी मंगळवारी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत काश्मीरचा उल्लेख केला होता. Pakistan again mentions Kashmir in UNSC Know what is Indias reaction

रवींद्र म्हणाले, ‘एका प्रतिनिधीने सवयीने आपल्या देशाचा अभिन्न आणि अविभाज्य भाग असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख केला आहे. मी या टिप्पण्यांना जितके महत्त्व दिले पाहिजे तितकेच देईन आणि वेळ लक्षात घेता मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.’

तत्पूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले की, सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्ये बेकायदेशीर आणि अन्यायकारक आहेत, मग ती मुंबईतील लोकांना लक्ष्य करून लष्कर-ए-तैयबाने केली असतील किंवा किबुत्झ बेरी मध्ये हमासने नागरिकांना लक्ष्य केलेले असेल.

Pakistan again mentions Kashmir in UNSC Know what is Indias reaction

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात