वृत्तसंस्था
ओटावा : भारत आणि कॅनडामधील संबंध अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. आता कॅनडाने भारतातून आपल्या 41 मुत्सद्दींना परत बोलावले आहे. गुरुवारी, 19 ऑक्टोबर रोजी कॅनडाच्या माजी परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, कॅनडा सूडाची पावले उचलणार नाही. गेल्या महिन्यात भारताने कॅनडाला आपली राजनैतिक उपस्थिती कमी करण्यास सांगितले होते. 18 जून रोजी खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर हा वाद सुरू झाला होता. Canada confirms return of 41 Canadian diplomats, diplomatic ties strained
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारत सरकार आणि निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाचा विश्वसनीय पुरावा असल्याचा आरोप केल्यानंतर, भारताने कॅनडाला देशातील आपली राजनैतिक उपस्थिती कमी करण्यास सांगितले होते. भारताने निज्जरच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा इन्कार केला होता. भारताने निज्जरला दहशतवादी म्हणून वर्गीकृत केले होते.
जॉली म्हणतात की, भारताने शुक्रवारपर्यंत डिप्लोमॅट्सचा अधिकृत दर्जा एकतर्फी रद्द करण्याची धमकी दिली होती. जॉली यांनी याला अनुचित आणि असामान्य म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी हे राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन म्हटले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत सरकारचा कल लक्षात घेऊन डिप्लोमॅट्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
राजनयिकांना दिलेली प्रतिकारशक्ती मोडू दिली तर या पृथ्वीतलावर कुठेही डिप्लोमॅट्स सुरक्षित राहणार नाहीत आणि त्यामुळेच कॅनडा यावर प्रतिक्रिया देणार नाही, असेही त्या म्हणाल्या. कॅनडाचे आता भारतात 21 राजनयिक आहेत. येथून 41 डिप्लोमॅट निघाले असून त्यांच्यावर अवलंबून असलेले 42 लोकही भारत सोडून गेले आहेत.
व्हिसा अर्जात येणार नाही अडचण
कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांच्या मते, डिप्लोमॅट निघून गेल्याने कॅनडाला इमिग्रेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागेल. त्यांनी कबूल केले की सध्याच्या परिस्थितीमुळे कॅनडामधील ग्राहक, कुटुंबे, शैक्षणिक संस्था, समुदाय आणि व्यवसायांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. मात्र, भारतातील व्हिसा अर्ज केंद्रे थर्ड पार्टीमार्फत चालवली जात असतील, तर त्याचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कॅनडाच्या लोकसंख्येपैकी 5 टक्के म्हणजे सुमारे 2 मिलियन कॅनेडियन नागरिक भारतीय वंशाचे आहेत. कॅनडामध्ये भारतातील विद्यार्थ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App