या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः

देवाने सगळ्यात सुंदर काय घडवलं असेल तर ती स्त्री…काया, वाचा, मन सगळं सगळं त्यानं दिलं तिला आणि मुख्यत्वे दिली सहनशीलता, निर्णयक्षमता कोणत्याही अवघड प्रसंगी न डगमगता विचार करून संकटांवर मात करण्याचे कौशल्यं!! Navratri special artcile 3

निसर्गाने नवनिर्मितीचे अधिकारी केले स्त्री ला. प्रचंड ऊर्जास्रोत केलं तिला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी!!, असे उगीचच म्हणत नाहीत. एक चालता बोलता जीव जन्माला घालण्यासाठी सक्षम शरीर आणि तितकंच हळवं मन हवं. याचं सुंदर एकत्रितपणे रूप स्त्री मध्ये असलेलं मातारूप. बाळाच्या सुखासाठी आपली वेदना लपवणारी असते आई. स्वतःच्या प्राणांचीही पर्वा नसते तिला जेव्हा तिच्या देहातुन नवा अंकुर फुटतो!!

आई म्हणजे मूर्तिमंत वात्सल्य. संस्कारक्षम पाल्य घडवण्यासाठी ती विशेष परिश्रम घेते. संस्कृती जपण्याचा वारसा आपोआपच स्वकृतीने मुलांवर बिंबवते. मुलांवरचे अनेक आघात स्वतः सोसत त्याना सुखरूप ठेवते. मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून स्वतःच्या कितीतरी इच्छा ती मनात बंद करून ठेवते.

आई होण्याचा प्रवास खरंच सोपा नसतो. इतर नाती जपताना, सांभाळताना आईपण निभवायचं म्हणजे स्वतःलाच अर्पण करणे असतं. या भूमिकेत डोळसपणे हरपून जाणं असतं… म्हणूनच सगळ्यांच्या जीवनात “आई” या व्यक्तिरेखेला महत्त्व असतं. आई म्हणजे रणरणत्या उन्हात डोक्यावर धरलेलं छत्र असतं. अनेकदा माणुस थांबतो, शिणून जातो, थकतो पण आईच असते जी या सगळ्यांवर मात करत खंबीरपणे जीवनप्रवास शिकवते. स्वकर्तृत्वाने मुलांना आदर्श घालून देते. स्वयंशिस्त शिकवते.

आई म्हणजे देवाला भेटण्यासाठी आळवलेली प्रार्थना असते. जगातील कोणतंही यश मिळवा. आई समोर उभे राहा. तिच्या डोळ्यात असलेले आनंदाश्रू पाहा. तिचा मायेने डोक्यावरून फिरणारा हात म्हणजे सर्वोच्च बक्षीस होय!! आई कधीच बदलत नाही. भेद करत नाही. चुकते ती आपली धारणा. आपले मनोकल्पित विचार. जगात सगळ्यात मोठा त्याग करणारी एकच व्यक्ती आई आत्मा आणि ईश्वर यांचं एकच अनोखे रूप म्हणजे आई!!

आपण मोठे झाल्यावर सहजच गृहीत धरतो ती आई …जिच्या भोवती आपलं सगळं विश्व असतं कधीतरी …मग तीचे जग मुलंच होतात… पण मुलांनी उंच उंच आकाशात भरारी घेतल्यावर तिच्याकडे मात्र मुलांचे सहजच लक्ष देणे कमी होते…

या नवरात्रीच्या जागरात मातृशक्तीची आराधना करत आईची जाणीव ठेवू या. समाजातील वृद्धाश्रमांमध्ये यथाशक्ती मदत करून कर्तव्य पालन करू या!!
देवीला आपण आई म्हणतो ते या निरपेक्ष त्यागामुळेच. त्रिवार वंदन या माऊलींना!!

या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः

वाचकांना मनोनमन !

Navratri special artcile 3

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात