धूम ४’ मध्ये झळकणार शाहरुख खान? समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी

पुणे : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं चांगलंच खास ठरलं. ‘पठाण’च्या धमाकेदार यशानंतर शाहरुखच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. लोकांनी चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला. आता शाहरुख लवकरच सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये एका छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. shahrukh khan in Dhoom 4 News

याबरोबरच शाहरुख ‘धूम ४’मध्येही झळकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुखचा एक खास व्हिडीओ शेयर केला ज्यात तो एका उंच इमारतीवरुन उडी मारताना दिसत आहे. याबरोबरच प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येत असल्याचंही या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे.

हा व्हिडीओ बाहेर येताच शाहरुखच्या चाहत्यांनी तो ‘धूम ४’मध्ये दिसणार याची चर्चा सुरू केली. काहींनी तर हा छोटासा व्हिडीओ ‘धूम ४’चा टीझर असल्याचंही स्पष्ट केलं. अशातच आता यामागील सत्य बाहेर आलं आहे. यश राज फिल्म्स सध्या ‘धूम ४’वर काम करत नसून शाहरुख खानही या चित्रपटात दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

shahrukh khan in Dhoom 4 News

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात