मीरा बोरवणकरांचे पुस्तक; ताईंचा दादा बचाव; पण पुतण्याची काकांच्या चौकशीची मागणी; पवार कुटुंबीयांच्या भूमिकेत विसंगती

प्रतिनिधी

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर पुस्तक लिहिले. त्यातले अजित पवार, येरवड्याची 3 सरकारी जमीन आणि शाहिद बलवा हे निवडक प्रकरण माध्यमांनी बाहेर काढले त्यानंतर ताईंनी दादांचा बचाव केला पण पुतण्याने काकांच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली. यातून पवार कुटुंबातली राजकीय विसंगती बाहेर आली!!Meera Borvankar; Tai’s Grandfather Rescue; But the nephew’s demand for the uncle’s inquiry; Inconsistency in the role of the Pawar family

मीरा बोरवणकरांनी “मॅडम कमिशनर” पुस्तकात अनेक खुलासे केले त्यापैकी एक खुलासा येरवड्यातल्या 3 एकर शासकीय जमिनीचा होता ही 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातला आरोपी शाहिद बलवा याच्या डीबी रियालिटीज कंपनीला द्यावी, यासाठी दादा पालकमंत्र्यांचा दबाव होता. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील हे देखील या पालकमंत्र्याच्या दबावाखालीच होते, पण आपण कठोर भूमिका घेऊन येरवड्यातल्या जमिनीचा लिलाव हाणून पाडला आणि दरम्यानच्या काळात शाहिद बलवाला 2 जी घोटाळ्यात अटक झाली, पण नंतर दादा पालकमंत्र्यांनी या पुण्याच्या पोलीस आयुक्तांचे काहीतरी केले पाहिजे, असे सांगून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न केला, असे मीरा बोलवणकरांनी पुस्तकात लिहिले आहे.



मात्र त्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांचा बचाव करताना दिसल्या. मीरा बोरवणकरांचे पुस्तक आपण वाचलेलेच नाही. त्यामुळे त्यावर आपण काही बोलणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात संपविले.

पण आमदार रोहित पवारांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मीरा बोरवणकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पुस्तकात काही गंभीर आरोप केले असतील, तर त्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले.

या सर्व प्रकारात ताई स्वतः दादांचा बचाव करताना दिसल्या, तर पुतण्याने मात्र काकांच्या चौकशीची मागणी करून पवारांच्या कुटुंबातच येरवड्याच्या जमीन गैरव्यवहार विषयावर परस्पर विसंगत मते असल्याचे दाखवून दिले.

Meera Borvankar; Tai’s Grandfather Rescue; But the nephew’s demand for the uncle’s inquiry; Inconsistency in the role of the Pawar family

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात