वृत्तसंस्था
चेन्नई : क्रिकेट विश्वचषकाच्या भारताच्या पहिल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन टीमला आपल्या फिरकी बोटांवर नाचवले आणि 200 गुंडाळले. अख्खी ऑस्ट्रेलियन टीम 199 मध्ये गारद झाली. world cup 2023 cricket india vs australia
रविंद्र जडेजा, आर. आश्विन अन् कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकवायला लावले. रवींद्र जडेजाने 10 षटकांमध्ये 28 धावा देत 3 गडी बाद केले, तर प्रत्येक गोलंदाजाला 1 विकेट मिळाली आहे. फिरकी गोलंदाजांनी 5 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो पहिल्याच सामन्यात फसला. ऑस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. सामन्याच्या तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्शला बाद केले. विराट कोहलीने स्लीपमध्ये भन्नाट कॅच घेतला अन् वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक कॅचेस घेणारा पहिला भारतीय ठरला.
त्यानंतर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चिवट झुंज दिली. मात्र, कुपदीप यादवने वॉर्नरला तंबूत धाडले. त्यानंतर रविंद्र जडेजाने सुत्र हातात घेतली आणि 9 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 3 मुख्य फलंदाज बाद केले. स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी आणि मार्नस लॅबुशेन यांना जड्डूने झटपट बाद करून ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले.
110 धावांवर 2 गडी बाद अशी धावसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया संघ 140 वर 7 आऊट, अशा परिस्थिती सापडला.
त्यानंतरही त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. मिशेच स्टार्क अन् पॅट कमिन्सच्या सावध खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला फक्त 199 धावांपर्यंत मजल मारता आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App