विशेष प्रतिनिधी
मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपयांची भर पडणार असतानाच भारतीय क्रिकेट नियम मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेट वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका ट्विट द्वारे ही घोषणा केली.mineral water for spectators in stadiums in every match of Cricket World Cup; Jai Shah’s announcement
क्रिकेट विश्व चषकादरम्यान वेगवेगळ्या माध्यमांमधून भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 220 अब्ज रुपयांची भर पडणार असल्याचा अंदाज इकॉनॉमिस्टने व्यक्त केला आहे.
🏏 Exciting times ahead as we anticipate the first ball of @ICC @cricketworldcup 2023 ! 🌟 I am proud to announce that we're providing FREE mineral and packaged drinking water for spectators at stadiums across India. Stay hydrated and enjoy the games! 🏟️ Let's create… pic.twitter.com/rAuIfV5fCR — Jay Shah (@JayShah) October 5, 2023
🏏 Exciting times ahead as we anticipate the first ball of @ICC @cricketworldcup 2023 ! 🌟
I am proud to announce that we're providing FREE mineral and packaged drinking water for spectators at stadiums across India. Stay hydrated and enjoy the games!
🏟️ Let's create… pic.twitter.com/rAuIfV5fCR
— Jay Shah (@JayShah) October 5, 2023
भारतात क्रिकेट विश्वचषक होण्याचा काळ हा ऑक्टोबर हिटचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विश्वचषकाचे मुख्य आयोजक भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने प्रेक्षकांच्या सोयीसाठी मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली आहे. हे पाणी मिनरल वॉटर तर असेलच, पण ते पॅकही असेल, असेही जय शाह यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
भारतात क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने हॉटस्टारने त्याचे प्रक्षेपण सर्व जगभरातल्या प्रेक्षकांना मोफत उपलब्ध करून दिले आहे, ते आपल्या मोबाईलवर तसेच टीव्हीवर पाहता येईल. त्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक सामन्या दरम्यान स्टेडियम मधल्या प्रेक्षकांना मोफत मिनरल वॉटर देण्याची घोषणा केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App