देशाचे नाव बदलायचा मोदी सरकारचा होता डाव, पण घाबरून अचानक त्यांनी आणले महिला आरक्षण; राहुल गांधींचा अजब दावा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 33 % महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशात प्रचंड आनंदाचे वातावरण असताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मात्र वेगळाच अजब दावा केला आहे. मोदी सरकारला म्हणे, देशाचे नाव बदलायचे होते, पण त्यांनी घाबरून अचानक महिला आरक्षण विधेयक म्हणून मंजूर करून घेतले, असा अजब दावा राहुल गांधींनी केला आहे. Congress MP Rahul Gandhi, however, made a different claim

राजस्थानात जयपूर मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ झाला. त्या समारंभा नंतर झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफा डागल्या. पण त्यात त्यांनी वर उल्लेख केलेला अजब दावा केला.

राहुल गांधी म्हणाले, की मूळात मोदी सरकारला महिला आरक्षण आणायचेच नव्हते. देशाचे नाव बदलायचा त्यांचा डाव होता. पण भारतातले लोक हे स्वीकारणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अचानक महिला आरक्षण आणले. कारण संसदेचे विशेष अधिवेशन ते आधीच बोलवून बसले होते. अधिवेशनापासून माघार घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मग त्यांनी अचानक महिला आरक्षण आणून ते संमत करून घेतले.

वास्तविक 33 % महिला आरक्षण ताबडतोब देता येणे शक्य आहे, पण त्यात मोदी सरकारने जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना हे दोन मुद्दे अनावश्यक घातले. त्यामुळे आरक्षण 5 – 10 वर्षे पुढे ढकलले गेले. वास्तविक आरक्षण आत्ताच द्यायला हवे. त्यातही ओबीसींना त्या आरक्षणातून लाभ द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली.

Congress MP Rahul Gandhi, however, made a different claim

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात