काँग्रेस जिल्हाध्यक्षावर केले आहेत आरोप, जाणून घ्या काय म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
बाडमेर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस पक्ष सरकार पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांच्या याद्याही तयार केल्या जात आहेत. दरम्यान बाडमेर जिल्ह्यातील शिव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमीन खान यांनी तिकिटासाठी दावा केला आहे. Congress MLAs open challenge to Gehlot government
आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष फतेह खान यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्लाबोल करत अमीन खान म्हणाले की, मी परिसरात विकासकामे करून घेतली आहेत. येथून माझ्याशिवाय कोणी दुसरा मुस्लिम उमेदवार जिंकला तर मी एक लाख एक रुपये द्यायला तयार आहे. तसेच, माझ्याशिवाय इतर कोणाला तिकीट मिळाले तर त्याचा ४० हजार मतांनी पराभव होईल. असा दावाही त्यांनी केला.
आमदार अमीन खान हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी नऊ वेळा शिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे आणि पाच वेळा ते विजयी झाले आहेत. याआधी ३० ऑगस्ट रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तिकीट वाटपावरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष फतेह खान यांच्यावर बेईमानीचा आरोप केला होता. तसेच त्यांनी हे देखील म्हटले होते की, माझे तिकीट कापले गेले तर माझ्या मुलाला द्या. त्यांनी दावा केला होता की, जर मला किंवा माझ्या मुलाला तिकीट मिळाले तरच काँग्रेस शिव विधानसभा जिंकू शकेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App