लडाखमधील न्योमा येथे २१८ कोटी खर्चून जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड बांधले जाणार!

Rajnath singh new

LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर: शिखर परिषद संपल्यानंतर काही मिनिटांतच भारताने चीनला मोठा संदेश दिला आहे. लडाखमधील न्योमा येथे भारत जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड बांधणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 12 सप्टेंबर रोजी जम्मूतील देवक पुलावरून या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. The highest fighter airfield in the world will be built at a cost of 218 crores at Nyoma in Ladakh

LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे. सीमेवर चीनला कडवी टक्कर देण्यासाठी या एअरफील्डचे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या अगोदर संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी ट्वीटद्वारे सांगितले की, नवी दिल्ली येथे ऐतिहासिक G20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताच्या नेतृत्वाने  जागतिक पटलावर आपली अमिट छाप सोडली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्व गुरु’ आणि ‘विश्व बंधू’ या दोन्ही रूपात भारताची ताकद यशस्वीपणे दाखवून दिली आहे.

The highest fighter airfield in the world will be built at a cost of 218 crores at Nyoma in Ladakh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात