केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I.A की BHARAT हा राजकीय वाद शिगेला पोहोचला असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेला एक गंभीर इशारा, जो माध्यमांकडून दुर्लक्षित राहिला, तो एकट्या शशी थरूर यांना समजला आहे.I.N.D.I.A ki BHARAT : Only Shashi Tharoor knew Rajnath’s warning!!
राजकारणात अनेकदा छोट्या मोठ्या चुका होतात. अंदाज आणि निर्णय चुकतात, पण त्याची जाहीर कबूली देण्याचे मनोधैर्य फार कमी लोकांकडे आढळते, हे मनोधैर्य राजनाथ सिंह यांनी नुकतेच दाखविले. मध्य प्रदेशातल्या नीमच मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना राजनाथ सिंह यांनी भाजपची झालेली चूक कबूल केली आणि त्यातून त्यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला. ती चूक म्हणजे इंडिया शायनिंची घोषणा!!
2004 च्या निवडणुकीत भाजपने इंडिया शायनिंगची घोषणा दिली होती. या घोषणेची चमक दमक एवढी होती, की त्या केवळ घोषणेने आपण लोकसभा निवडणुकीत तरुन जाऊ, असे भाजपचे त्यावेळचे निवडणूक रणनीतीकार प्रमोद महाजनांना वाटले आणि त्यांनी इंडिया शायनिंगची घोषणा अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या भाजप श्रेष्ठींच्या गळी उतरवली. त्यांनी देखील ती घोषणा भाजपला निवडणुकीत तरुन नेईल, असे मानले. त्यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे या वरिष्ठ नेत्यांमध्ये स्वतः राजनाथ सिंह सुद्धा होते.
पण इंडिया शायनिंग घोषणेला भाजपची नौका निवडणुकीच्या सागरातून पार नेता आली नाही. 2004 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली यूपीए अस्तित्वात आली आणि त्यांनी 10 वर्षे राज्य केले. राजनाथ सिंह यांनी नीमचच्या सभेत नेमके हेच राजकीय सत्य सांगून भाजपने केलेल्या चुकीची जाहीर कबुली दिली.
“इंडिया” हे नाव भयानक आहे. आम्ही इंडिया शायनिंग घोषणा देऊन चूक केली. तुम्ही ती चूक करायला नको होती. पण तुम्ही “इंडिया” नाव घेतले त्यामुळे तुमचाही पराभव अटळ आहे, असे ते जाहीर रित्या म्हणाले. पण राजनाथ सिंह यांच्या त्या भाषणातला केवळ राहुल या लॉन्च होऊ शकले नाही, हा मुद्दा माध्यमांनी हायलाईट करून सांगितला. त्याच्या हेडलाईन केल्या. पण 2004 मध्ये भाजपने इंडिया शायनिंगची चूक केली या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले आणि नेमका हाच कळीचा मुद्दा होता.
पण माध्यमांचे त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले तरी काँग्रेसचे चाणक्य नेते असलेल्या शशी थरूर यांचे त्याकडे बिलकुलच दुर्लक्ष झाले नाही. त्यांनी राजनाथ सिंह यांच्या भाषणातला “तो” धागा बरोबर पकडला आणि “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांना त्यातला गंभीर इशारा समजावून सांगत आपण वेळीच I.N.D.I.A हे नाव टाकून देऊ आणि आघाडीला BHARAT हे नाव घेऊ असे अशी सूचना शशी थरूर यांनी केली.
या BHARAT ची त्यांनी फोडही करून सांगितली. ती अशी : अलायन्स फॉर बेटरमेंट हार्मनी अँड रिस्पॉन्सिबल ऍडव्हान्समेंट फॉर टुमारो!! पण यातले राजकीय गांभीर्य अद्याप काँग्रेस नेत्यांना समजलेले नाही. कारण शशी थरूर यांच्या सूचनेवर अंमलबजावणी तर सोडाच, साधी प्रतिक्रिया ही व्यक्त करण्याची तसदी अद्याप काँग्रेस नेत्यांनी घेतलेली नाही.
राजनाथ सिंह यांचा इशारा यासाठी गंभीर आहे की ते इंडिया शायनिंग घोषणा देणाऱ्यांमधले एक प्रमुख नेते होते. मोदी आणि शाह यांच्या भाजपमध
ले ते सध्याचे एकमेव नेते आहे, जे वाजपेयी – आडवाणींच्या भाजपमधून सुखरूप तरुन मोदी – शाहांच्या भाजपमध्ये येऊन फिट बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या इशाऱ्याला खरं म्हणजे विशेष महत्त्व आहे.
एरवी कोणताही राजकीय नेता इतका गंभीर इशारा स्वतःहून पुढे येऊन विरोधकांना देत नसतो. पण राजनाथ सिंह यांनी ते धैर्य दाखविले आहे. आता या धैर्याचा उपयोग काँग्रेसने ते कशा करून घेतात आणि त्याची अंमलबजावणी काय करतात??, यावर “इंडिया” आघाडीपेक्षा काँग्रेसचे भवितव्य जास्त अवलंबून आहे.
एरवी काँग्रेस नेते नितीन गडकरींमध्ये भाजपमधले “संभाव्य बंडखोर” शोधत असतात. मोदींना डिवचण्यासाठी ते वारंवार गडकरींचे नाव घेतात. पण त्याचा काही उपयोग होत नाही. कारण मोदी – गडकरींमध्ये काँग्रेसला अपेक्षित असणारी दरी उत्पन्न होत नाही. पण ही खरी काँग्रेस नेत्यांची “राजकीय नासमझी” आहे.
वास्तविक राजनाथ सिंह यांनी त्यांना खरा समजदारीचा इशारा दिला आहे आणि तो सरळ सरळ लढाईची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. “इंडिया” नाव धारण केल्याने तुमचेच नुकसान होईल. तुम्ही वेळीच सुधारा हे सांगणार आहे. पण एकट्याच शशी थरूर यांना तो समजला आहे, बाकीचे काँग्रेस नेते आजही “नासमझच” आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App