रयत मराठ्यांनो, निजामी मराठ्यांच्या नादी लागू नका!!; प्रकाश आंबेडकर यांचे परखड ट्विट


प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाला त्यांचेच पुढारी न्याय असलेल्या हक्काचे आरक्षण मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे रयत मराठा समाजाने निजामी मराठ्यांच्या मागे न जाता मानवी मूल्यांवर आधारित लढा पुढे न्यावा, तरच कोणत्याही समाजाला न दुखवता त्या आरक्षण मिळवू शकतील, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. Prakash Ambedkar’s famous tweet

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात उपोषण करत आहेत. राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी नेते त्यांना भेटून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासंदर्भातले परखड मत व्यक्त केले.

राजकीय नेत्यांची आंतरवली सराटी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासनं ही सर्व नौटंकी आहे, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यांनी ट्विट करत मराठा आरक्षणावरून राज्यातील प्रमुख नेत्यांवर टीकास्र सोडले.

– प्रकाश आंबेडकरांची ट्विट अशी :

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यासारख्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही? त्यांची आंतरवली सराटी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते. ताकद उभी केली असती. धोरण बदलायला दडपण आणले असते.

याउलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटीमुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांमध्ये तणाव वाढला आहे. सर्व रयत मराठ्यांना माझं आवाहन आहे. यातून दंगल न घडवताही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही, तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घ्या. याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पद्धतीने पुढे रेटता येईल.

Prakash Ambedkar’s famous tweet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात