महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि गोवा, कर्नाटक, केरळ या किनारपट्टी भागात पाऊस पडेल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. Maharashtra will receive less than average rainfall in September Meteorological Department has predicted
सप्टेंबरच्या पंधरवड्यात दख्खनचे पठार आणि मध्य भारतात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात चार आठवडे पावसाचा अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याने आज सप्टेंबर महिन्यासाठी चार आठवड्यांच्या पावसाचा अंदाज जाहीर केला. सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान दख्खनच्या पठारावर आणि मध्य भारतात पावसाचे पुनरागमन होईल, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ या किनारपट्टी भागात पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App