मणिपूरवर मोदी लोकसभेत बोलले, अविश्वास ठरावावर विरोधकांनी मतदान टाळले; पण बाहेर येऊन “बाईट राजकारण” सुरू केले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलावे म्हणून विरोधकांनी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला. त्यावर तीन दिवस चर्चा घ्यायला लावली. सरकारचे जोरदार वाभाडे काढले. पण प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी अविश्वास ठरावावर उत्तर द्यायला लागले आणि मणिपूरवर बोलू लागले, त्यावेळी मात्र विरोधक सदनातून सभात्याग करून निघून गेले. मोदींचे मणिपूरवरचे उत्तर ऐकायलाही विरोधक सभागृहात थांबले नाहीत. पण सभागृहाबाहेर येऊन त्यांनी नेहमीप्रमाणे “बाईट राजकारण” सुरू केले. Opposition walkedout while Modi was speaking on manipur

इकडे मोदी मणिपूरवर लोकसभेत विस्ताराने बोलत होते आणि सभात्याग केलेले विरोधक बाहेर येऊन वेगवेगळ्या पत्रकारांना बाईट देऊन आपले राजकारण साधू पाहत होते. अविश्वास ठरावावर प्रत्यक्ष मतविभाजन करण्याची मागणी विरोधकांनी टाळली. कारण त्यातून राष्ट्रवादी सारख्या “इंडिया” आघाडीतल्या पक्षात फूट दिसली असती. मत विभाजनात पराभव झाला असता तो अलगच, पण “इंडिया” आघाडीत कोण उरले आणि कोण गेले?? हे देशासमोर उघड्यावर आले असते, त्यामुळे विरोधकांनी चतुराईने सभागृहातून पळ काढला. बाहेर येऊन पत्रकारांना बाईट देऊन आपले राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न केला.

बाईटमध्येही तेच आरोप

यात समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, लालूप्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आघाडीवर होते. या सर्वांनी पत्रकारांना बाईट देऊन पुन्हा मोदी सरकारवर जुनाच हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी मणिपूरवर बोलतील अशी अपेक्षा होती, पण त्यांचे 90% भाषण “इंडिया” आघाडीवर टीका करणारेच होते, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. पण मोदी मणिपूरवर लोकसभेत बोलत असताना त्या सदनात हजर राहिल्या नाहीत. तशीच अवस्था डिंपल यादव, असदुद्दीन ओवैसी, मनोज झा या खासदारांची होती. त्यांनी देखील मोदी सरकारवर जुनेच आरोप करणारी बाईट पत्रकारांना दिले.

अंगात नाही बळ, पण चिमटा काढून पळ

मोदींचे भाषण अर्ध्यावरच टाकून विरोधकांनी सहभात्या केला. पण त्यानंतर अविश्वास ठराव मांडणाऱ्या काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जुनेच आरोप केले. नेमके त्याच वेळी मोदी लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर सविस्तर बोलून मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल अशी ग्वाही देत होते. त्यामुळे 2023 चा विरोधकांचा अविश्वास ठराव म्हणजे, “अंगात नाही बळ, नुसताच चिमटा काढून पळ”, अशी झाल्याचे दिसून आले!!

Opposition walkedout while Modi was speaking on manipur,

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात