सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ; अभिनेता चिन्मय मांडलेकरांनी मांनंले प्रेक्षकांचे आभार


विशेष प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवरायांची यशोगाथा सांगणारे अनेक सिनेमे महाराष्ट्राच्या या मराठी चित्रपट विश्वात निर्माण झाले. त्यातले काही सिनेमे आणि काही मालिका आजही शिवप्रेमींच्या मनात अगदी घर करून आहेत. Upcoming movie Subedar trailer launching.

शिवरायांवर प्रचंड प्रेम करणारा मराठी समुदाय हा कायमच शिवकालीन कलाकृतीवर मनापासून प्रेम करतो. आणि याचाच प्रत्यय शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादात दिसला.
शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या या चित्रपटाची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या सिनेमाचं प्रमोशन करताना आपल्याला दिसते. पुण्यात देखील या सिनेमाचाट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यातं आला होता.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे.

ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक ‘सुभेदार तानाजी मालुसरे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर ७ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यावर अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाच्या ट्रेलरने नवा विक्रम रचला आहे. ट्रेलरला अवघ्या दोन दिवसांत २ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मराठी भाषेत अशी कामगिरी करणारा आणि ट्रेलरला वेगाने २ मिलियन व्ह्यू मिळवणारा ‘सुभेदार’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यासंदर्भात अभिनेता चिन्मय मांडलेकरने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Upcoming movie Subedar trailer launching.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात