विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी उत्तर देत असताना विरोधक लोकसभेतून सभात्याग करून निघून गेले, तरी पंतप्रधानांनी मणिपूरच्या जखमांवर फुंकर घालून मलम लावलेच!! PM Modi assure manipur of restoration of peace
मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या महिला भगिनींना दिलासा दिला.
विरोधी पक्षाने लोकसभेत आणलेला अविश्वास प्रस्ताव आवाज मतदानाने फेटाळला गेला. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल 2 तास 14 मिनिटे भाषण केले. अविश्वास प्रस्तावावरील हे आत्तापर्यंतच सर्वात मोठे भाषण होते.
मोदींनी सुरूवातीला मणिपूर हिंसाचारावर उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी विरोधी पक्षाने सभात्याग केला.
– मोदी म्हणाले :
विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते बोलायला तयार आहेत, पण ऐकायला तयार नाहीत. ते खोटे बोलून पळून जातात, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मणिपूरवर नुसतीच चर्चा झाली तर गृहमंत्र्यांनी पत्र देखील लिहिलं होतं, पण विरोधकांचा हेतू चर्चेचा नव्हता. त्याच्या पोटात दुखत होतं, असंही मोदी म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केलं आहे. मणिपूरमध्ये न्यायालयाचा निर्णय आला. त्यांच्या बाजूने आणि विरोधाची परिस्थिती निर्माण झाली आणि हिंसाचाराचा काळ सुरू झाला.
मणिपूरमधील हिंसाचारामध्ये अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावावं लागलं. महिलांवार गुन्हे घडले. मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल.
राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली. आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालू या!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App