विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर राणा भीमदेवी थाटात काँग्रेस सह सर्व विरोधकांनी मोदी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणला खरा, पण अविश्वास ठरावाच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर मत विभाजन मागण्याचे टाळले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या झाकल्या मुठीत पाच खासदार जसेच्या तसे राहिले!!Opposition walkout kept NCP intact in loksabha, split didn’t appear in parliament
अविश्वास ठरावावर मतदानाची नौबतच आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी काढलेले परस्पर विरोधी व्हिप अपरिणामकारक ठरले. मत विभाजन झाले असते, तर राष्ट्रवादीच्या पाच खासदारांनी नेमका कोणाचा व्हिप पाळला, हे उघड झाले असते आणि त्यातून राष्ट्रवादीतली फूट संसदेच्या पटलावर दिसली असती. पण अविश्वास ठरावावर मतदार विभाजनाची मागणी न करताच विरोधकांनी सभात्याग केला आणि ते मोदींचे भाषण अर्ध्यावरच टाकून उठून निघून गेले. त्यामुळे अविश्वास ठराव आवाजी मतदाराने फेटाळला गेला. मत विभाजन टाळण्याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. कारण काका पुतण्यांमधली नुरा कुस्ती जशीच्या तशी इंटॅक्ट राहिली संसदेच्या पटलावर ती उघड्यावर आली नाही.
लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. त्यापैकी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल हे शरदनिष्ठ राष्ट्रवादीत आहेत, तर एकटे सुनील तटकरे हे अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे खासदार उरले आहेत. पण दोन्ही गटांनी अविश्वास ठरावाच्या वेळी मतदान करण्यासाठी परस्परविरोधी व्हिप काढले होते.
मोहम्मद फैजल यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने आणि मोदी सरकारच्या विरोधात व्हीप काढला होता, तर सुनील तटकरे यांनी मोदी सरकारच्या बाजूने आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात व्हिप काढला होता. प्रत्यक्ष मतदान झाले असते तर कोणाचा व्हिप खरा, हे उघड करावे लागले असते. त्यातून राष्ट्रवादीतली फूट संसदेच्या पटलावर दिसली असती. पण मत विभाजन टळल्याने राष्ट्रवादीतील फूट संसदेच्या पटलावर दिसली नाही आणि पक्षाच्या झाकल्या मुठीत पाच खासदार जसेच्या तसे राहिले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App