No Confidence Motion: मोदी सरकारविरोधातील I.N.D.I.A आघाडीचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरला


काँग्रेस विरोधी पक्षनेते  अधीर रंजन चौधरींवर निलंबनाची कारवाई

विशेष प्रतनिधी

नवी दिल्ली : लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात विरोधी आघाडी ‘इंडिया’ने आणलेला अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरला. केंद्र सरकारने आवाजी मतदानाने अविश्वास ठराव जिंकला. लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. No Confidence Motion INDIAs noconfidence motion against Modi government fails in Lok Sabha

सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. याशिवाय सभागृहातील शिस्तभंग केल्याप्रकरणी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांच्यावर  निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सलग तीन दिवसांच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर दिले. 2 तास 12 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलं. मणिपूरमध्ये लवकरच शांततेचा सूर्य उगवेल, असं ते म्हणाले. तर मोदींचे भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला होता.

शुक्रवारी लोकसभेत मणिपूरवर चर्चा होणार आहे. यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाईल. कारण शुक्रवार 11 ऑगस्ट हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

No Confidence Motion INDIAs noconfidence motion against Modi government fails in Lok Sabha

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात