
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेत दिल्ली संदर्भातले विधेयक मंजूर झाल्यावर विरोधकांची I.N.D.I.A आघाडी तुटेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीला बाय-बाय करून निघून जातील, असे बोचरे भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केले. The I.N.D.I.A alliance will be broken after the Delhi Bill is passed in Parliament
दिल्लीतील बदल्यांसंदर्भात केजरीवाल सरकारची वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दिल्ली विधेयक मांडले. त्या विषयावर उत्तर देताना अमित शाह लोकसभेत बोलत होते. काँग्रेस सह सर्व विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे उत्तर देताना अमित शाह म्हणाले, दिल्ली विधेयक संसदेत मंजूर झाल्याबरोबर “इंडिया” आघाडी तुटणार आहे. कारण केजरीवाल तुम्हाला सोडून जाणार आहेत. तसेही तुम्ही कितीही एकत्र आलात तरी 130 कोटी जनतेला माहिती आहे की मोदींना तुम्ही हरवू शकत नाहीत. तुम्ही कितीही एकत्र आलात अजून दोन – चार पक्षांना एकत्र केले तरी पुन्हा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत, असा टोला अमित शाह यांनी विरोधकांना लगावला.
केंद्र सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार असताना विरोधकांनी गोंधळ घातला तरी लोकसभेत चर्चेला सामोरे आले नाहीत. त्यांना मणिपूरची चिंता नाही. लोकशाहीची चिंता नाही. त्यांना दिल्ली विधेयका संदर्भात मात्र चिंता यासाठी वाटते की त्यामुळे त्यांची “इंडिया” आघाडी टिकून राहील पण लोकसभेत जसे दिल्ली विधेयक मंजूर होईल, तशी “इंडिया” आघाडी पण तुटेल. संसदेत बाकीची देखील महत्त्वाची विधेयके आली. त्यावेळी विरोधकांनी एकजूट दाखवून चर्चा केली नाही. फक्त दिल्ली विधेयकावरच ते एकजूट दाखवायला पुढे आले. कारण त्यांना फक्त निवडणुकीची चिंता वाटते आणि म्हणून ते एकत्र आलेत, असा टोलाही अमित शाह यांनी विरोधकांना हाणला.
The I.N.D.I.A alliance will be broken after the Delhi Bill is passed in Parliament
महत्वाच्या बातम्या
- हे काय करून बसलास मित्रा? नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची भावुक पोस्ट
- लवासा लेक सिटीत डार्विन ग्रुप उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिभव्य पुतळा!!
- ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ स्थानके विकसित केली जाणार
- Haryana Violence : नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या या भागात निर्बंध