प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात पावसाने दिलेली ओढ आणि काही भागात आता येत असलेला पूर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मागण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची विधिमंडळात भेट घेतली. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र भेटण्याचे टाळले. Uddhav Thackeray directly met Ajit Dada on the occasion of asking for help for farmers
उद्धव ठाकरे सहसा विधिमंडळात येत नाहीत. पण काल विरोधी पक्षांच्या बैठकीला बंगलोरमध्ये उपस्थित राहिल्यानंतर आज त्यांनी मुंबईत विधिमंडळात येऊन आपल्या आमदारांशी चर्चा केली आणि त्यानंतर ते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे काही आमदार यांच्यासह अजित पवारांना भेटायला गेले. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत केली पाहिजे, अशी मागणी केली. या भेटीची माहिती स्वतः उद्धव ठाकरे यांनीच पत्रकारांना दिली. सत्तेसाठी महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय घडामोडी घडत असल्या तरी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनतेचे मूळ प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून आपण अजित पवारांना भेटलो. कारण महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बॅक डोअर चॅनेल ओपन
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या या भेटीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांसाठी मदतच मागायची होती तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची होती कारण ते त्यावेळी विधिमंडळातच होते, असा एक मतप्रवाह सुरू झाला आहे मात्र उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांना टाळून थेट अजित पवारांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात वेगळ्या ट्रेंडची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे – फडणवीस यांना टाळून आपली कामे करून घेण्यासाठी अजित पवारांना भेटणे हा काँग्रेस शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी बॅकडोअर चॅनल ओपन झाला आहे, असे म्हटले जात आहे.
#WATCH | Former Maharashtra CM Uddhav Thackeray meets Maharashtra Deputy CM Ajit Pawar, in Mumbai pic.twitter.com/RAIrI4SFWT — ANI (@ANI) July 19, 2023
#WATCH | Former Maharashtra CM Uddhav Thackeray meets Maharashtra Deputy CM Ajit Pawar, in Mumbai pic.twitter.com/RAIrI4SFWT
— ANI (@ANI) July 19, 2023
पवारांनाही डिवचले
त्याचवेळी शिंदे – फडणवीस यांना टाळून उद्धव ठाकरेंनी अजितदादांची भेट घेणे हे फक्त शिंदे फडणवीस यांनाच डिवचणे नव्हे, तर शरद पवारांनाही डिवचण्यासारखे झाले आहे, असेही विधिमंडळ परिसरात बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App