‘’जर अशापद्धतीने घराणेशाहीच चालू राहिली, तर आणखी पाच वर्षांनी…’’ असा टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आता लवकरच सक्रीय राजकारणात पदार्पण करणार आहेत. यासाठी त्यांनी थेट बारामतीचं मैदान निवडत सुप्रिया सुळेंविरोधात कंबर कसली आहे. मात्र मोठा राजकीय अनुभव, उत्कृष्ट संसदपटू असणाऱ्या आणि पवारांची पॉवर पाठीशी असलेल्या सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी तृप्ती देसाईंची तयारी कशी असणार आहे?, त्यांची भूमिका नेमकी काय आहे? आदी प्रश्नांना खुद्द तृप्ती देसाई यांनीच बेधडकपणे उत्तरं दिली आहेत. द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात त्या बोलत होत्या. If Supriya Sule is an excellent parliamentarian then Sharad Pawar should take her to Rajya Sabha Tripti Desai
तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘’ सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू असतील तर मग त्यांना शरद पवारांनी राज्यसभेवर घ्यावं. त्यांचं लोकसभा मतदारसंघात जमिनीवर काहीच काम नाही. त्यामुळे लोकांना कंटाळा आला आहे, त्यांच्या स्वभावाविषयी देखील अनेक वेगवेगळ्या चर्चा आहेत. परंतु अनेक ठिकाणी जी सर्वसामान्यांची कामे आहेत, तिथे सुप्रिया सुळेंविषयी लोकांची नाराजी आहे. म्हणूनच सुरुवातीला आता कुठल्याही पक्षात न जाता आमच्या भूमाता ब्रिगेडच्य माध्यमातून आम्ही जनसंपर्क दौरा सुरू करणार आहोत. प्रत्यके गावोगावी आम्ही तिथे जाणार आहोत. जे काही सहा मतदारसंघ आहेत, २२ लाखांहून अधिक मतदार तिथे आहेत. अनेक प्रश्न मार्गी लागलेली नाहीत. त्यामुळे आम्ही कुठंतरी आरोप करतोय, यापेक्षा लोकांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे, की कुठल्या गावात कोणती कामे मार्गी लागलेली नाहीत किंवा त्यांच्या काय समस्या आहेत? ती जेव्हा आमच्याकडे यादी येईल, तेव्हा मात्र आम्ही प्रचार सुरू करणार.’’
Exclusive Interview : म्हणूनच ठरवलं की आता आपण राजकारणात जायचं’’ तृप्ती देसाईंनी केला खुलासा!
याचबरोबर ‘’ मला वाटतं आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही काय फक्त गाडीतून उतरून सभेला जाणारे कार्यकर्ते नाही. त्यामुळे आमची जी रणनिती आहे, ती चळवळीतून असणार आहे. गावागावात जाऊन जनतेची लाट निर्माण करणं असेल, त्या ठिकाणी जाऊन लोकांचं जनजागरण करणं असेल किंवा तिथे आपण कशापद्धतीने योग्य काम करू शकतो संधी दिल्यावर, हे लोकांना सांगणं असेल. जर अशापद्धतीने घराणेशाहीच चालू राहिली, तर आणखी पाच वर्षांनी सुप्रिया सुळेंची मुलगीही २५ वर्षांची होईल, मुलगा २५ वर्षांचा होईल आणि मग त्यांना उमेदवारी मिळेल. सर्वसामान्यामधून जर कोणी तिथे आलं, तर मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. लोकांचा तसा प्रतिसाद आहे, लोकांना तिथे परिवर्तन हवं आहे. लोकं या चेहऱ्याला कंटाळलेली आहे. म्हणून मला वाटतं की आमचा मार्ग अजून सुकर होईल, फक्त लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे. चळवळीतील असल्याने लोकांमध्ये जाऊनच आम्ही प्रचार करणार आहोत.’’ अशी माहितीही तृप्ती देसाईंनी यावेळी दिली.
याशिवाय, ‘’सुप्रिया सुळे या घराणेशाहीच्या उमेदवार आहेत, म्हणून आमचा त्यांना विरोध आहे. उद्या जर त्यांना वाटलं, जेव्हा आमचा जनसंपर्क दौरा सुरू होईल किंवा सुप्रिया सुळेंची जागा अडचणीत येते आहे आणि पराभव निश्चितच आहे, त्यावेळी राष्ट्रवादीने जर बोलावलं तर मला जायला काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की शरद पवारांनी आतापर्यंत महिलांसाठी भरपूर काम केलेलं आहे, अगदी महिलांना आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवलेला आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्या वाटू शकतं एखाद्या चळवळीतील नेतृत्वाला आपण बोलावावं, यात चुकीचं काहीच नाही. परंतु माझं तसं कुठलही काही बोलणं झालेलं नाही. केवळ तुम्ही प्रश्न विचारला आहे, म्हणून मी सांगत आहे की उद्या जर तशी संधी आली तर नक्कीच मी त्या बैठकीला जाईन. त्यांच्याशी चर्चा करेन, परंतु इथे बदल झाला पाहिजे. यासाठी मात्र आम्ही इथे लढणार आहोत. राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली नाहीतर तो त्यावेळी आम्ही विचार करू. परंतु आता घोषणा केल्यानंतर आम आदमी पार्टीची लोक माझ्याकडे येऊन गेली आहेत. बसपाची काही नेते माझ्या संपर्कात आहेत. अनेक छोटे-मोठे पक्ष आहेत, की त्यांना वाटतय चळवळीतून हे नेतृत्व पुढे येतय, तर आमची उमेदवारी त्यांनी घ्यावी. राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी नक्कीच या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे.’’ अशा शब्दांत तृप्ती देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App