रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा; पंतप्रधान मोदींची झेलेन्सकीना सूचना; युक्रेनला मानवीय मदतीचीही ग्वाही

वृत्तसंस्था

हिरोशिमा : रशिया – युक्रेन युद्धातून राजनैतिक वाटाघाटींद्वारेच मार्ग काढावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांना केली आहे. त्याचबरोबर भारत सध्या युक्रेनला मानवीय दृष्टिकोनातून देत असलेल्या देत असलेली मदत पुढे चालू ठेवण्याचीही ग्वाही पंतप्रधान मोदींनी झेलेन्सकी यांना दिली आहे. PM Modi was invited by Ukrainian President Volodymyr Zelenskyy to visit Ukraine

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी पंतप्रधान मोदी – झेलेन्सकी यांच्या भेटी संदर्भात पत्रकारांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानमध्ये जी 7 या प्रगत देशांच्या बैठकीसाठी हिरोशिमाला गेले आहेत तेथे g7 ची बैठक तर झालीच, पण त्याचबरोबर भारत – अमेरिका – ऑस्ट्रेलिया आणि जपान या संरक्षण चतुष्कोण अर्थात क्वाडची शिखर बैठकही झाली.

त्याचबरोबर g7 च्या बैठकीला आलेले युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी रशिया युक्रेन युद्ध संदर्भात चर्चा केली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी राजनैतिक वाटाघाटी करूनच सध्याच्या युद्धातून मार्ग काढावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर भारत युक्रेन मधल्या जनतेला मानवीय दृष्टिकोनातून जी मदत देत आहे, ती यापुढेही चालू ठेवण्याची ग्वाही मोदींनी झेलेन्सकी यांना दिली.

PM Modi was invited by Ukrainian President Volodymyr Zelenskyy to visit Ukraine

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात