वयाच्या 84 व्या वर्षी पवारांचे नाव पुन्हा पंतप्रधानपदाच्या रेस मध्ये; यशवंतराव गडाख यांनी केला दावा

प्रतिनिधी

नगर : 1991 पासून सतत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये असलेले नाव परत एकदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याच रेसमध्ये आले आहे. शरद पवार वयाच्या 84 व्या वर्षी पंतप्रधान बनू शकतात, असा दावा त्यांचे जुने सहकारी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी केला आहे. Yashwant gadakh stakes claim for sharad Pawar’s prime ministerial candidature

आपल्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांची बोलताना यशवंतराव गडाख यांनी राजकीय अनुभव कथन केले. त्याचवेळी त्यांनी शरद पवारांच्या पंतप्रधान पदाचा दावा केला. शरद पवारांकडे आजही प्रचंड ऊर्जा आहे. त्यांनी आजारावर मात केली आहे. त्यांची कारकीर्द राजकीय संघर्षाचे राहिली आहे. जनतेच्या सतत संपर्कात राहणे हीच त्यांची ऊर्जा त्यांना वयाच्या 84 व्या वर्षी देखील पंतप्रधानपदी नेऊन बसवू शकते, असा दावा गडाख यांनी केला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कालच शरद पवारांची मुंबई भेट घेऊन विरोधी एकजुटीसाठी प्रयत्नांचे पुढचे पाऊल टाकले आणि आज यशवंतराव गडाख यांनी पवारांच्या पंतप्रधान पदाचा दावा केला त्याला विशेष महत्त्व आहे.

दिल्लीतल्या चौकडीवर पराभवाचे खापर

त्याच वेळी गडाखांनी 1991 मध्ये नरसिंहराव यांच्याशी झालेल्या सत्ता संघर्षात आपण पवारांच्या बाजूने मतदान केले होते याची आठवण करून दिली. पण राजधानी दिल्लीतल्या काँग्रेसमधल्या चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान बनू शकले नव्हते, असे ते म्हणाले.



बाळासाहेबांशी मैत्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा देखील गडाखंड आवर्जून उल्लेख केला. उद्धव ठाकरे आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या लाखा लाखांच्या सभा होतात. त्यामुळे 2024 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच लोक मतदान करून सरकार आणतील, असा दावाही त्यांनी केला.

विखे विरुद्ध गडाख गाजलेली निवडणूक

हेच ते यशवंतराव गडाख आहेत, ज्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढवून त्यांना पराभूत केले होते. परंतु त्यांची निवडणूक न्यायालयाच्या कचाट्यात सापडली आणि खासदारकी रद्द झाली होती. गडाख जुन्या काळापासून पवारनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली असून आजही ते सक्रिय आहेत. त्यांचे पुतणे शंकरराव गडाख शिवसेनेच्या उद्धव गटाबरोबर संलग्न असून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते.

पंतप्रधान पदाच्या रेस मधले रेकॉर्ड

यशवंतराव गडाख यांनी पवारांच्या पंतप्रधान पदावर भाष्य करून त्यांचे नाव पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आणले आहे. त्यामुळे 1991 ते 2023 24 तब्बल 33 वर्षे पवारांचे नाव पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आहे. पवारांची राजकीय कारकीर्द 60 वर्षांची धरली तर ते निम्म्यापेक्षा जास्त वर्षे पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये आहेत आणि हे भारतीय लोकशाहीत अनोखे रेकॉर्ड आहे.

Yashwant gadakh stakes claim for sharad Pawar’s prime ministerial candidature

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात